Press "Enter" to skip to content

किस्से प्रतिभावंत व्यक्तिमत्त्वांचे…

ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज
सर डॉन ब्रॅडमन व इंग्लंडचे तितकेच
खंदे फलंदाज डेनिस कॉम्प्टन याचा
दोघांचे ही स्वभाव विशेष सांगणारा हा किस्सा–
एकदा कसोटी सामन्याचे वेळी ब्रॅडमन
यांनी इंग्लंडचे नामवंत क्रीडापत्रकार
सर नेव्हील कार्ड्स यानां रात्री जेवण्याचे आमंत्रण दिले होते.
ठरल्या प्रमाणे ते हॉटेलमध्ये पोहोचले
तर तेथील काउंटर वर ब्रॅडमन यानी
त्यांचे साठी चिठ्ठी लिहून ठेवलेलीहोती
“आज जरी आपले एकत्र जेवण्याचे
ठरले असले तरी दुर्दैवाने मला हा
कार्यक्रम पुढे ढकलावा लागतोय.
मी जेवून घेतले आहे अन आता झोपावायास जात आहे. तुमच्या
संघाने आज आम्हाला खुप टेन्शन
दिले आहे. हा सामना जर ऑस्ट्रेलिया
ला वाचवायचा असेल तर मला उद्या
किमान २५० धावा करावयास हव्यात
अन त्या साठी मला आज लवकर
झोपलेच पाहिजे.दिलेली अपॉइंटमेंट
मी पाळू न शकल्या बद्दल क्षमस्व.
दुसऱ्या दिवशी ब्रॅडमन यांनी २५०चे
वर धावा करुन तो सामना वाचवला.
याच परिस्थितीत जर इंग्लड असतं
अन कॉम्प्टन वर ही वेळ आली असती
तर कॉम्प्टन असे मुळीच वागले नसते
त्यांनी मद्याचे ग्लास भरले असते अन
नाईटक्लब च्या धुंद वातावरणात सर्व टेन्शन विसरण्याचा प्रयत्न केला असता व पहाटे चोरपावलाने रुम वर येवून दुसरे दिवशी त्याने ही२५०धावा
ठोकल्या असत्या व मग ते यश साजरे
करण्यासाठी रात्री पुन्हा नाईट क्लब
गाठला असता.
एकदा लॉर्ड्स वर सर्व खेळाडू
ब्रेकफास्ट करीतअसताना कॉम्प्टन
पार्टी ड्रेस मधेच आला कारण तो
रात्रीच्याधुंद पार्टी हुन परस्पर आला होता.त्यांच्या कर्णधार नॉर्मन यार्डलेने
मनातील संताप डोळ्यात आणत त्याचे कडे रोखून पाहत त्याला
सुनावले “आज जर तू शतक काढले
नाहीस तर मला तोंड दाखवू नकोस.”
कॉम्प्टन ने त्याच दिवशी दणदणीत
शतक ठोकले अन तो यार्डले समोर
उभा राहिला. यार्डले ने त्याला
कडकडुन मिठी मारली.
मद्य हे त्याच्या साठी टॉनिक होते.
एकदा लिंडवाल चा बौन्सर त्याचे
डोळ्याचे थोडा वर बसला. तो वाहती
जखम घेऊन ड्रेसिंगरुम मध्ये आला
त्याचे जखमेवर दोन तीन टाके
घातल्या वर तो पुन्हा फलंदाजी ला
निघाला,जाताना त्याने नेपोलियन
व्हिस्कीचा पतियाळापेग गपकन
गिळला अन बाहेर जाऊन खणखणीत
नाबाद१५०धावा ठोकल्या.
कॉम्प्टन जिनियस होता,पण तो
अनुकरणीय नव्हता.
अशा माणसां कडे कौतुकाने फक्त
पहावयाचे , त्याचे अनुकरण करण्याचे
फंदात पडू नये.
आधार-
‘अफलातून अवलीये’
द्वारकानाथ संझीगिरी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.