Press "Enter" to skip to content

सरगम लायन्स तर्फे तळोजा प्राथमिक शाळेत वाचनालय

तळोजा : प्रतिनिधी

सरगम लायन्स क्लबतर्फे सुरु करण्यात आलेले वाचनालय हा अतिशय स्तुत्य आणि गरजेचा उपक्रम असल्याचे प्रतिपादन लायन्सचे प्रांतपाल प्रवीण सरनाईक यांनी काढले. ते लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे तळोजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी सरगम लायन्स संचालित जयवंत तुकाराम बहिरा वाचनालयाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.

सरगम लायन्स क्लब अतिशय सुंदर काम करत असून पूर्ण जिल्ह्यामध्ये क्लबने आपल्या कामाचा ठसा उमटवला तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन प्रवीण सरनाईक यांनी केले. तसेच त्यांनी सरगम क्लबचे माजी अध्यक्ष प्रेमेंद्र बहिरा यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ हे वाचनालय सुरु केले त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणुन प्रथम प्रांतपाल विजय गणात्रा, द्वितीय प्रांतपाल नमिता मिश्रा, जीएसटी चेअरमन अनिल म्हात्रे हे उपस्थित होते.

संजय गोडसे यांनी क्लबच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करुन या उपक्रमाचा हेतु सांगितला तसेच हा उपक्रम साकार होण्यामागे शाळेचे मुख्याध्यापक शंकर ठाकूर, योगिनी वैदू तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि कमिटी सभासद यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे सांगितले. सरगम क्लबचे अध्यक्ष आदित्य दोशी यांनी सरगम क्लबतर्फे सुरु केलेला हा तिसरा स्थायी स्वरुपाचा उपक्रम असल्याचे सांगितले. तळोजा शाळेचे मुख्याध्यापक शंकर ठाकूर यांनी सरगम क्लबचे आभार मानले आणि यापुढे सुद्धा लायन्सचे सहकार्य मिळत राहील असा विश्वास व्यक्त केला. प्रथम प्रांतपाल विजय गणात्रा यांनी सरगम क्लब विविध समाजोपयोगी उपक्रम नेहमीच करत असल्याचे सांगुन त्यांचे सहकार्य कायम राहील असे सांगितले.

याच कार्यक्रमात सरगम क्लब आणि जीएसटी चेअरमन अनिल म्हात्रे यांचे वतीने शाळेसाठी प्रथमोपचार पेट्या आणि वह्या देण्यात आल्या तसेच सर्व विद्यार्थ्यांना क्लब तर्फे लस्सी वाटप करण्यात आले.
शाळेच्या सहशिक्षिका योगिनी वैदू यांनी हे वाचनालय सुरु केल्याबद्दल प्रेमेंद्र बहिरा त्यांची आई प्रमिला जयवंत बहिरा यांचे विशेष आभार मानून या उपक्रमामागे संजय गोडसे यांनी दुवा म्हणुन काम केल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे त्यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाला रिजन चेअरमन अल्केश शहा, प्रमिला जयवंत बहिरा आणि कुटुंबीय, शाळेचे कमिटी मेंबर किशोर कांबळे, सुधाकर गरुडे , सरगम क्लबचे मानदा पंडित, अनिल परमार, स्वाती गोडसे, जयेश मणियार, मिलिंद जोशी, संध्या महानुभाव, सुनील देशपांडे, सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.