Press "Enter" to skip to content

अभिनेते विकास वायाळ यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या महाराष्ट्र प्रवक्तापदी निवड

मुंबई / प्रतिनिधी

दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या महाराष्ट्र प्रवक्तापदी अभिनेते विकास वायाळ यांची निवड करण्यात आली आहे. कलाकारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून देशभरातील कलाकारांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे अध्यक्ष अजित महामुनकर यांनी विकास वायाळ यांची महाराष्ट्र प्रवक्तापदी निवड जाहीर केली. वायाळ यांना कलाक्षेत्राचा दांडगा अनुभव असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्रातील कलाकारांना होईल, असा विश्वास अध्यक्ष अजित महामुनकर यांनी व्यक्त केला.

कलाकारांच्या समस्या शासन व संबंधित यंत्रणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विकास वायाळ यांच्या माध्यमातून संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कलाक्षेत्राशी संबंधित माहिती, बातम्या तसेच विविध उपक्रमांच्या माहितीसाठी इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया, प्रिंट मीडिया व इतर माध्यमांनी दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे महाराष्ट्र प्रवक्ते अभिनेते विकास वायाळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री विकास वायाळ हे द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे मुंबई कार्याध्यक्ष आहेत

या निवडीबद्दल दैनिक युवक आधारचे संपादक तथा दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मीडिया विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संतोष शिवदास आमले व द युवा ग्रामीण पत्रकार संघटना अखिल भारतीय अध्यक्ष अन्सार शेख साहेब व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शकील मणियार साहेब यांनी अभिनेते विकास वायाळ यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.