जातीय सलोख्याचे सदाबहार तोरण
तोरण होय तोरणच! कादिर भाई चा उल्लेख मी तोरण म्हणूनच करीन…कारण दरवाजाची शोभा वाढवणारे तोरण मिरवायचे असते,आमचा कादिर भाई अगदी तस्साच आहे.मिरवण्यासारखा! त्यांना मी हक्काने “आमचा कादिर भाई” असे म्हणतो कारण माझा आणि त्यांचा परिचय अगदी कॉलेज पासूनचा…तेव्हा त्याचे वागणे पाहून हा भविष्यात मोठा राजकीय नेता बनणार! हा माझा अडाखा अगदी तंतोतंत खरा ठरला.आज त्यांचा जन्मदिन आहे,त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देत असतानाच ते करत असलेले कार्य ते असंच अविरतपणे करत राहोत ही मनापासून सदिच्छा.
कादिरभाई यांचे सामाजिक कार्य अफाट आहे, ते जर का एखाद्या लेखात गुंफायचे म्हटले तर त्यासाठी शब्दमर्यादा माझ्यासारख्या लेखकाची लेखणी अडवतात. पण जातीय सलोखा राखण्यासाठी त्यांचे अमर्याद कष्ट मात्र मला या लेखात मांडलेच पाहिजेत. क्यू कोई मजहबो मे फरक करता है? ये मुझे समझ नही आता ….आखिर खून तो सबका लाल ही है… या प्रामाणिक भावनेतून जिवन जगणारे कादिरभाई जातीजातीमध्ये,धर्मा धर्मांमध्ये तेढ पसरवणाऱ्या नराधमांच्या विरोधात आघाडी उघडून काम करत आहेत.हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित ठेवण्यात आजपर्यंत चे आयुष्य त्यांनी खर्ची घातले आहे.
सुखवस्तू कुटुंबातील जन्म असला तरीसुद्धा आपल्या ताटामध्ये येणारा अतिरिक्त घास हा गरीब गरजू किंबहुना समाजातील तळागाळातील नागरिकांना देण्यामध्ये ही व्यक्ती धन्यता मानते. कादरभाई यांच्या याच उदारमतवादी व्यक्तिमत्वाने मला भुरळ घातली आहे. अगदी कॉलेज जीवनापासूनच ह्या व्यक्तिमत्वाचे विचार हे मानवतावादी आणि सर्वसमावेशक राहिले आहेत.
शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष म्हणून आज कादिर भाई कार्य करत आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या सर्वधर्म समावेशक विचारधारेशी प्रामाणिक राहात ते इमानेइतबारे काम करत आहेत. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे समीकरण ते तंतोतंत पाळतात. मी तर पुढे जाऊन हेही म्हणेन की वीस टक्के राजकारण करतानासुद्धा सर्वपक्षीय कार्यकर्ते,पदाधिकारी आणि नेते यांच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत असतात. मंदार भाई चार दिन की चांदनी है …कहा किसी के साथ पंगा लेके अपनी जिंदगी खराब करानी है .. अगर करना ही है तो कुछ इन्सानो का भला कर दिया जाये…हे या व्यक्ती चे घोषवाक्य असते. एखाद्या अडलेल्या नडलेल्या व्यक्तीला गरज असेल तर वेळेचीही तमा न बाळगता कादिर भाई धावून जाताना मी पाहिले आहेत.
प्रत्येक यशस्वी व्यक्तिमत्त्वाला संघर्षमय कालखंडातून जावेच लागते. असाच संघर्ष कादरभाई ना देखील भोगावा लागला आहे. अल्पसंतुष्ट समाजविघातक वृत्तींनी या व्यक्तिमत्त्वाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अत्यंत खडतर आणि संघर्षमय या कालखंडाला देखील कादरभाई पुरून उरले. अर्थातच अल्ला, ईश्वर आणि सर्वधर्मीय नागरिकांच्या शुभेच्छा पाठीमागे असल्यामुळेच या खडतर प्रसंगातून तरलो… या प्रामाणिक भावना कादरभाई आजही चारचौघात बोलून दाखवतात.
कोई कुछ भी करले मेरी अच्छाई मेरा कवच है.. मैं बस अच्छाई करता रहुंगा …. या अवलियाचे प्रतिमा स्खलन करणाऱ्या विघातक वृत्तींना त्याचे हे प्रामाणिक उत्तर ऐकल्यानंतर गप गुमान घरी बसावे लागेल याबद्दल जराही दुमत नाही.
कार्यकर्ता असो की सामान्य नागरिक त्याची जात,धर्म न पाहता केवळ मानवतेच्या दृष्टीकोनातून प्रत्येकाला मदत करताना कादिर भाई मनामध्ये कुठलाही स्वार्थ ठेवत नाहीत. मला असे वाटते की या व्यक्तिमत्त्वाचा हा अत्यंत सकारात्मक पैलू आहे. किंबहुना हे त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्त्याचे फार मोठे शक्तिस्थान आहे. शेतकरी कामगार पक्षाने कुठलीही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली तर ती पार पडणारच हा विश्वास शेकापक्षाच्या नेतृत्वाला असतो. मग शुभेच्छांचे फलक लावणे असो, आंदोलना करता मनुष्यबळ जमवणे असो, एखाद्या मुजोर अधिकाऱ्याला जाब विचारणे असो किंवा कुणा गोरगरिबांना न्याय मिळवून देणे असो.एकदा का कादिर भाई यांच्यावर जबाबदारी टाकली तर ती पूर्ण होणारच!
कॉलेज जीवनातील माझा हा हरहुन्नरी मित्र आज शेतकरी कामगार पक्षाचे फार मोठे पद भूषवत असल्याचा मला अभिमान आहे. वैयक्तिक आयुष्यात अनेक यशाचे डोंगर पादाक्रांत करत असताना सुद्धा या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे पाय अजूनही जमिनीवर आहेत ही खरोखरच कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल.
काल महा विकास आघाडीने केंद्र सरकारच्या तुघलकी निर्णयाविरोधात काढलेल्या मोर्चात कादिरभाई हिरीरीने सहभागी झालेले दिसले. चाळीशी लोटल्यानंतर सुद्धा या व्यक्तिमत्त्वाचे तेज जराही कमी झालेले नाही. तोच टवटवीतपणा, तोच उत्साह, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळ्यांसाठी धावून जाण्याचा तोच धडाकेबाज स्वभाव.खडतर संघर्षमय कालखंडातून बाहेर निघाल्यानंतर कादिर भाईच्या मनामध्ये थोडीसुद्धा सूडभावना नाही याचे खरोखरच आश्चर्य वाटते. त्यांच्या अंगात मुरलेला हाच मानवतावाद, हीच सर्वसमावेशक दृष्टी आणि हाच उदारमतवादी पणा असाच कायम जिवंत राहो हीच त्यांच्या जन्मदिनी सदिच्छा.
मंदार दोंदे.








Be First to Comment