Press "Enter" to skip to content

पॉइंट 2 पॉइंट

हैदराबाद ने उघडले गुणांचे खाते

सलग दोन विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजीला आलेल्या सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad ) संघाच्या धावगतीवर त्यांनी वेसण घातले. जॉनी बेअरस्टो आणि केन विलियम्सन यांनी दमदार खेळ करत संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. त्यानंतर रशीद खान नं मॅच विनिंग गोलंदाजी केली.त्याला भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, अभिषेक वर्मा आणि टी नटराजन यांची सुरेख साथ लाभली. अखेर सनरायझर्स हैदराबादनं IPL 2020मधील पहिल्या विजयाची नोंद करताना दिल्ली कॅपिटल्सची विजयी हॅटट्रिक होऊ दिली नाही.दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. वॉर्नरने 33 चेंडूंत 3 चौकार 2 षटकारांसह 45 धावा केल्या. बेअरस्टो 48 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 53 धावा करून माघारी परतला. केननंही 26 चेंडूंत 5 चौकारांसह 41 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादनं 20 षटकांत 4 बाद 162 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना DCचा सलामीवीर पृथ्वी शॉ 2 धावांवर पहिल्याच षटकात माघारी परतला. भुवनेश्वर कुमारनं त्याला बाद केलं. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, रशीद खाननं अय्यरला ( 17) बाद करून 40 धावांची ही भागीदारी संपुष्टात आणली. 12व्या षटकात रशीदनं DCला मोठा दणका दिला. शिखर धवनला त्याने यष्टिंमागे जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. धवनने 34 धावा केल्या.

शिमरोन हेटमायर आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी चौथ्या विकेटसाठी 42 धावांची ताबडतोड भागीदारी केली. रिषभ व हेटमायर यांनी सुरेख षटकार खेचले. ही जोडी तोडण्यासाठी वॉर्नरने भुवनेश्वर कुमारला पाचारण केले आणि त्यानं यश मिळवून दिले. शिमरोन हेटमायर 16व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर 21 धावांवर मनीष पांडेच्या हाती झेल देऊन माघारी परतला. रिषभ दुसऱ्या बाजूनं फटकेबाजी करत होता, परंतु रशीदनं SRHला आणखी एक यश मिळवून दिलं. रशीदच्या चेंडूवर अतरंगी शॉट मारण्याच्या नादात रिषभ ( 32) बाद झाला.

टी नटराजनने त्याच्या स्पेलच्या अखेरच्या चेंडूवर DCचा स्फोटक फलंदाज मार्कस स्टॉयनिसला पायचीत करून सामन्यात चुरस निर्माण केली. त्यानंतर भुवीनं 19व्या षटकात धावा व चेंडू यांच्यातील अंतर वाढवले. अखेरच्या षटकात SRHला विजयासाठी 27 धावांची गरज होती, परंतु त्यांच्या तळाच्या फलंदाजांना हे आव्हान पेलवलं नाही. दिल्लीला 7 बाद 147 धावा करता आल्या. हैदराबादनं 15 धावांनी सामना जिंकला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.