Press "Enter" to skip to content

फणसवाडी (खारघर) येथे विविध औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण


पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः पुण्यश्‍लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्याच्या हेतूने श्री युवा मित्र मंडळ कामोठेचा विघ्नहर्ता व पनवेल तहसील कार्यालय, महसूल व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषद शाळा, फणसवाडी (खारघर) येथे विविध औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आले.

या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये औषधी वनस्पतींबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली. तसेच महसूल विभागाच्या वतीने नागरिकांच्या विविध प्रशासकीय अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष सुनील चौधरी, कार्याध्यक्ष सचिन तांबोळी, सचिव राहुल बुधे, सहसचिव अशोक भानुसे, उत्सव समितीचे उपाध्यक्ष ऋषी पुंडे व सागर पाटील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी औषधी वनस्पतींचे महत्त्व सांगत पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.