असा मॅसेज आला असेल तर रहा सावधान ! 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह / फ्राॅड अलर्ट : 🔷🔶🔶🔷
तुम्हाला जर तुमच्या व्हाॅटसॅप नंबरवर व्हाॅटसॅप कडून 25 लाखांची लाॅटरी लागल्याचा मॅसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा ! हा 100 टक्के फसवणुकीचा प्रकार आहे.
यात आपल्या व्हाॅटसॅप वर एक डिझाईन केलेले पोस्टर पाठवले जाते आणि सोबत एक व्हाईस मॅसेज ही येतो. यात सांगितले जाते की, तुम्हाला व्हाॅटसॅप कडून 25 लाखांची लाॅटरी लागली आहे आणि ती मिळवण्यासाठी आमच्या बँक मॅनेजर ला काॅल करा आणि तोही फक्त व्हाॅटसॅप काॅल करा. मग तो तुम्हाला पुढची माहीती देईल.
या प्रकारात सरळ सरळ फसवणुकचं होणार असल्याचे दिसून येत असून कोणीही अशा आमिषाला बळी पडून आपली फसवणूक करून घेऊ नये. तसेच पोलिसांनी देखील या प्रकरणी कोणाच्याही तक्रारीची वाट न पाहता विषेश लक्ष देऊन या गुन्हेगारांना वेळीच आवर घालावा असे आवाहन सिटी बेल लाइव्ह कडून करण्यात येत आहे.
हा मॅसेज स्वत: मला आला असून तो ऐकताच यात नक्कीच गौडबंगाल असल्याची मला खात्री झाली. म्हणूनच अशा फसवणूकीला कोणीही बळी पडू नये असे आमचे आवाहन आहे.
विवेक मोरेश्वर पाटील
समुह संपादक
सिटी बेल लाइव्ह
Be First to Comment