आता नाकातून covid ची लस देण्याचा प्रयत्न
जाणून घ्या काय आहे प्रकार…
सिटी बेल लाईव्ह
कोरोना व्हायरसची लस शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. इंजेक्शनसोबतच नाकाद्वारे दिली जाणारी कोरोनाची लस अनेक ठिकाणी तयार केली जात आहे. या लसीला नेझल स्प्रे किंवा इंट्रानेजल वॅक्सिन असं म्हणतात. कोरोना व्हायरस अनेकदा नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे नाकाद्वारे दिली जाणारी लस व्हायरसला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखू शकते. याशिवाय मोठ्या प्रमाणात उत्पादन करणं तुलनेनं सोपं असतं. नुकताच या संदर्भातील रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे.
उंदरांच्या एका गटाला इंजेक्शनचा वापर करून लस दिली होती.त्यानंतर SARS-CoV-2 ने संक्रमित केल्यानंतर फुफ्फुसांमध्ये व्हायरसचं संक्रमण दिसलं नाही. पण व्हायरल आरएनएचा काही भाग दिसून आला होता. तुलनेनं ज्या उंदंरांना नाकाद्वारे लस देण्यात आली होती. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये व्हायरल आरएनए नव्हते. या अभ्यासातून दिसून आलं की, नेजल स्प्रे लस IgC आणि म्यूकोसल IgA डिफेंर्सलाही वाढवण्यास मदत करते. त्यामुळे अशी लस परिणामकारक ठरते.
इंट्रामस्कुलर म्हणजेच इंजेक्शनवाली लस कमकुवत आणि म्यूकोसल रेस्पॉसला ट्रिगर करते. कारण इम्युन सेल्सना इंन्फेक्शनच्या जागी आणायचे असते. साधारण लसीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात लसीचे वितरण करणं सोपं पडतं. इंन्फ्लुएंजा व्हायरसची लस तयार करण्याासठी ज्या तंत्राचा वापर करण्यात आला होता. त्याच तंत्राचा वापर करून ही लस तयार केली जाते.
नेजल स्प्रे लस तुमच्या रोगप्रतिकारकशक्तीला रक्त आणि नाकाला प्रोटिन्स तयार करण्यासाठी मजबूत बनवते. या लसीचा वापर करताना डॉक्टर नाकात स्प्रे करतात आणि त्यानंतर दोन आठवड्यांनी या लसीचा परिणाम दिसायला सुरूवात होते. नाकाद्वारे दिल्या जात असलेल्या लसीने नेझल स्प्रे म्यूकोसल उघडले जातात. त्यानंतर धमन्या किंवा रक्त वाहिन्यांद्वारे संपूर्ण शरीरात लस पोहोचते. नेजल आणि ओरल लस विकसित करणारे तंत्र कमी प्रमाणात आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी नेझल स्प्रे लस कितपत परिणामकारक ठरेल हे येत्या काळात समजू शकेल. फ्लूसाठी तयार झालेली नेझल स्प्रे लस लहान मुलांवर प्रभावी ठरली असून वयस्कर लोकांमध्ये कमी परिणामकारक ठरली होती.
अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे औषध ICAM
अमेरिकेच्या फ्लोरिडामधील एडवेंटहेल्थ रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार चार वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांना एकत्र करून ही थेरेपी तयार केली आहे. या थेरेपीचं नाव ICAM आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ही थेरेपी परिणामकारक ठरते. bgr.com ने याबाबत माहिती दिली होती.
ox35orlando.com मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार ही नवीन थेरेपी तयार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, ही थेरेपी रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्याबरोबरच थेरेपी फुफ्फुसांचा इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी परिणामकारक ठरते. सध्या या थेरेपीची वैद्यकिय चाचणी सुरू आहे. चाचणीदरम्यान ICAM थेरेपी सुरक्षित आणि प्रभावी ठरल्यास रुग्णालयात भरती न होता कोरोना रुग्णांचे उपचार केले जाऊ शकतात. असा दावा तज्ज्ञांनी केला होता.

Be First to Comment