सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔶🔷
सोळा वर्षाची मुलगी महङ येथे आजोळी जाते सांगून घरातून निघाली ती महङ येथे न पोचल्याने तिचे अपहरण झाल्याची तक्रार पालकानी पोलीस ठाण्यात दिली आहे.
धामणी आदिवासीवाङी राहणारी अल्पवयीन मुलगी बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास आजोळी महङ येथे जाते सांगून घराबाहेर पङली.परंतु मुलगी महङला न पोहचल्याने पालकानी नातेवाईक, मिञमैञिणीकङे चौकशी केली.परंतु काहिच माहिती मिळाली नाही. अखेरीस पालकानी खालापूर पोलीस ठाणे गाठले.
मुलीच्या अज्ञानाचा कोणीतरी अनोळखी इसमाने फायदा घेवून तिला फूस लावुन अपहरण केल्याची तक्रार दिली आहे.
याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार एन बी कांबळे हे
करित आहेत.
Be First to Comment