Press "Enter" to skip to content

चेन्नई चा सलग दुसरा पराभव

चेन्नई चा सलग दुसरा पराभव

पहिल्या षटकापासून नियंत्रित मारा केलेल्या दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसरा विजय मिळवताना चेन्नई सुपरकिंग्जचा ४४ धावांनी पराभव केला.
दिल्लीने १७५ धावा उभारल्यानंतर चेन्नईला सुरुवातीपासून आवश्यक धावगती राखण्यात यश आले नाही. वरच्या स्थानावर फलदाजीला आलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनीही फार काही करु शकला नाही. अनुभवी फाफ डूप्लेसिस (४३) याने एकाकी झुंज दिली. त्याला दोनवेळा जीवदानही मिळाले, मात्र याचा फायदा तो घेऊ शकला नाही.


तत्पूर्वी, पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्या आक्रमक सुरुवातीच्या जोरावर दिल्लीने २० षटकांत ३ बाद १७५ धावांची मजल मारली.

पृथ्वीने ४३ चेंडूंत ९ चौकार व एका षटकारासह ६४ धावा केल्या. दोघांनी संथ सुरुवातीनंतर आक्रमक पवित्रा घेत चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. धवनने फिरकी गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने २७ चेंडूंत ३५ धावा केल्या. चेन्नईच्या सुमार क्षेत्ररक्षणाचाही दिल्लीला फायदा झाला. पृथ्वी-धवन बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर व रिषभ पंत यांनी संघाला समाधानकारक मजल मारुन दिली. अखेरच्या ५ षटकांत दिल्लीने ५१ धावा फटकावल्या. विशेष म्हणजे दिल्लीला पहिल्या दहा षटकानंतर एकही षटकार मारता आला नाही. पृथ्वी-धवन बाद झाल्यानंतर चेन्नईने नियंत्रित मारा करत दिल्लीला मोठ्या धावसंख्येपासून रोखले.

सामन्यातील रेकॉर्ड
पृथ्वीने आयपीएलमध्ये पाचव्यांदा अर्धशतक झळकावले.
३१ सामने खेळणाऱ्या या खेळाडूने कालच आयपीएलमध्ये हजार धावांचा टप्पा गाठला.
महेंद्रसिंग धोनीने १९३ वा आयपीएल सामना खेळताना सुरेश रैनाच्या सर्वाधिक आयपीएल सामने खेळण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. धोनी, रैनानंतर रोहित शर्मा याने (१९०) सर्वाधिक सामने खेळले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.