किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार के.एल. राहुल याने गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दणदणीत शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर पंजाबच्या संघाने बंगळुरूवर 97 धावांनी विजय मिळवला. राहुलने विराट कोहलीने दिलेल्या 2 जीवदानाचा फायदा उठवत 69 चेंडूत नाबाद 132 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 14 चौकार आणि 7 षटकार लगावले.
आयपीएलमध्ये कोणत्याही संघाच्या कर्णधाराने सर्वोच्च धावा ठोकण्याचा विक्रम आता राहुलच्या नावावर जमा झाला आहे. आयपीएलमध्ये सर्वोच्च धावा ठोकणारे कर्णधार
1. के. एल. राहुल – नाबाद 132 (2020)
2. डेव्हिड वॉर्नर – 126 (2017)
3. वीरेंद्र सेहवाग – 119 (2011)
4. विराट कोहली – 113 (2016)
5. विराट कोहली – 109 (2016
IPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट होतोय भयंकर ट्रोल
आयपीएलमध्ये कोणत्याही हिंदुस्थानी खेळाडूने सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम आता राहुलने आपल्या नवे केलाय. त्याने पंतचा विक्रम मोडला.
1. के. एल. राहुल – नाबाद 132 (2020)
2.ऋषभ पंत – नाबाद 128 (2018)
3. मुरली विजय – 127 (2010)
4. वीरेंद्र सेहवाग – 122 (2014)
5. पॉल वाल्थली – नाबाद 120 (2011)
आयपीएलमध्ये कर्णधार आणि खेळाडू म्हणून खेळताना शतक ठोकणाऱ्या मोजक्या खेळाडूंच्या यादीत आता राहुलचा समावेश झालाय.
1. वीरेंद्र सेहवाग
2. डेव्हिड वॉर्नर
3. के. एल. राहुल
राहुलने पंजाबसाठी सर्वाधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम केला असून त्याने सेहवागला मागे सोडले आहे.
1. के. एल राहुल – नाबाद 132 (2020)
2. वीरेंद्र सेहवाग – 122 (2014)
आयपीएलमध्ये वेगाने 2000 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता राहुलचा समावेश झाला आहे. राहुलने सचिन तेंडुलकर याचा विक्रमही मोडला आहे.
1. ख्रिस गेल – 48 डावात 2000 धावा
2. के. एल. राहुल – 60 डावात 2000 धावा
3. सचिन तेंडुलकर – 63 डावात 2000 धावा

Be First to Comment