सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔷🔶
देवपूजेच्या बहाण्याने भामट्याने खोपोलीत महिलेची सोन्याची माळ नेल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा दोन भामट्यानी पोलीस असल्याचे सांगत 70 हजार रूपये किंमतीचा हार हातोहात लंपास केला.या घटनेनी खोपोलीत खळबळ उङाली आहे.
खोपोलीतील वृंदावन नगर येथे राहणारी महिला बुधवारी दुपारी साङेबाराच्या सुमारास मोगलवाडी चौकाजवळ कारमेल स्कूल येथून रस्त्याने जात असताना दोन अनोळखी माणसांनी पोलीस असल्याची महिलेला सांगितले. अंगावर एवढे सोने का घालता असे सांगून महिलेच्या गळयातील सोन्याचा हार काढण्यास सांगितला. हार गळयातून काढल्यानंतर दोघानी कागदात गुंडाळत असल्याचे भासवत महिलेच्या बटव्याची चेन काढून आत ठेवण्याचा बहाना केला.
महिला घरी गेल्यानंतर बटवा उघङून पाहिला असता हार नसल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेनी खोपोली पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे.याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे दोन अनोळखी भामट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार एम शिद हे करीत आहेत.
Be First to Comment