कळंबोली प्राथमिक शाळा व आरोग्य केंद्रात प्लाझ्मा सेंटर, आय.सी.सी.यु. व्हेंटिलेटर बेडसह आँक्सिजन बेडची व्यवस्था करावी 🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी 🔷🔷🔶🔶
पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये कोविड -१९ साथीच्या महाभयंकर आजाराने पनवेलकर त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या महामारीत कारखाने व व्यवसाय बंद पडल्याने हाताला काम नाही कुटूूंब चालविणे मुश्किल झाले आहे. असा बिकट परिस्थितीत कोरानाची लागण झाली तर त्यांना मोठा दिलासा मिळावा म्हणून महापालिका प्रभाग ब मध्ये कळंबोली समाज मंदिर येथे प्लाझ्मा सेंटर, आय.सी.सी.यु. व्हेंटिलेटर बेड लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी नगरसेविका प्रिया भोईर यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाने थैमान चालु असून दररोज 250 च्यावर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत आता पर्यत ६० हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून ४०० च्या वर नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. वाढत्या कोरोना रुगणाच्या संख्येमुळे नागरिकात चिंतेचे वातावरण आहे. तेव्हा अशा कोरोनाच्या महामारीत पनवेलमधील जनतेचे आपण काही तरी देणे करी लागतो या लाजेने येथील जनतेला दिलासा देताना कोरोनाच्या कोविड -१९ रुग्णासाठी आय.सी.यु. व्हेंटिलेटर बेड सेंटर सुरू करण्याऐवजी सत्ताधारी व प्रशासन मिळून आपले महापालिका कार्यालय व क्रिकेट ग्राऊंड या गोष्टीला मान्यता देते . तेव्हा आयुक्त साहेबानी कार्यालयाच्या बाहेर येऊन पहा की , जनता आज रस्त्यावर फिरते कारण कोणाची आई कोरोना पॉजिटीव्ह आहे तर कोणाचे वडील , बहीण , भाऊ , पती , पत्नी कोरोना पॉजिटीव्ह आहे . लहान मुले देखील या आजाराला बळी पडले आहेत . आजवर देशावर आलेले हे महाभयंकर संकट आहे .
आज आपल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारने १ सप्टेंबर पासून व्हेंटिलेटर , पी.पी.ई. किट , टेस्टिंग किट , एन ९ ५ मारक अशा सर्व प्रकारच्या सुविधा बंद केल्या आहेत . येणारे पुढचे दिवस महाभयंकर होऊ शकतात , याची आपण जाणीव ठेवून जनतेसाठी प्रत्येक शहरात कळंबोली , खारघर , कामोठे , खांदा कॉलनी , पनवेल शहर तसेच ग्रामीण भागात देखील कोविड -१९ सेंटर व ऑक्सिजन सहित व्हेंटिलेटर बेडची सुविधा करावी. आज ही अत्यंत काळाची गरज आहे . महापालिकेचे ऑफिस व ग्राऊंड हे काळाची गरज नाही . आपण व सत्ताधारी नगरसेवक मिळून जे ठराव पास करता त्याजागी कोविड -१ ९ आय.सी.सी. यु . व्हेंटिलेटर बेड सेंटर उभारण्यासाठी पुढे यायाला पाहिजे.
प्रत्येक शहरात १०० बेड व त्यामध्ये २० ऑक्सिजन सहित व्हेंटिलेटर बेड दयावे . तसेच प्रत्येक गावात जिल्हा परिषद शाळा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तेथे १० बेड व त्यामध्ये २ किंवा ३ ऑक्सिजन सहित व्हेंटिलेटर बेड दयावे . जेणेकरून कोणत्याही पुरुषाला किंवा महिलेला आपले घरदार किंवा दागदागिने विकण्याची वेळ येणार नाही . ऑफिस होतच राहतील पण एखादा जीव गेला तर पुन्हा येणार नाही . जनता तुम्हाला माफ करणार नाही. आज पनवेल महानगरपालिकेमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा हा ४०० च्यावर गेला आहे . आजपर्यंत पनवेल महानगरपालिकेच्या हदिमध्ये ६०,००० नागरीक कोरोना पॉजिटिव्ह झाले आहेत . देव कृपेने व डॉक्टरांच्या अविरत सेवेच्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. पनवेल मधील कोरोना महामारीवर अंकुश आणायचा असेल माझ्या या अर्जाचा गांभीर्याने विचार करून कळंबोली समाज मंदिर येथे प्लाज्मा सेंटर तसेच आय.सी.सी.यु. व्हेंटिलेटर बेड लवकरात लवकर उपलब्ध करण्यात यावेत अशी मागणी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका प्रिया विजय भोईर यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे.
Be First to Comment