सिटी बेल लाइव्ह / खालापूर : 🔷🔷🔶🔶
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार खालापूर तालुक्यातील नडोदे ग्रामपंचायतीत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.
कोरोना महामारीने देशभरात थैमान घातले आहे. दिवसागणिक बाधितांची संख्या वाढत आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून आपापल्या परीने योजना राबविल्या जात आहेत. सरकारने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर केला असला तरी यामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. मागील महिन्यात सदर नियम शिथिल केले असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासन आणि प्रशासनाला विविध योजना राबविण्याचे आणि स्वतःला या आजरापासून सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले. याच पार्श्वभूमीवर राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही योजना लागू केली असून त्याला चांगला नागरी प्रतिसाद मिळत आहे.
नुकतेच खालापूर तालुक्यातील नडोदे ग्रामपंचायतीच्यावतीने या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, सरपंच दिव्या ठोंबरे, उपसरपंच नीता शिंदे, ग्रामसेवक विनायक कांबळे, आशावर्कर सुवर्णा ठोंबरे, अंगणवाडी सेविका रेश्मा फराट, दिनेश ठोंबरे संजय ठोंबरे, सीताराम शिंदे, विद्याधर सुर्वे आदी उपस्थित होते. दरम्यान, सदर योजनेला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. तसेच, याला नक्कीच यश मिळेल असे सांगण्यात येत आहे.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या योजनेला ग्रामपंचायत हद्दीत चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमच्या आशा वर्कर घरोघरी जाऊन ऑक्सिजन पातळी आणि शरीराचे तापमान तपासत आहेत. दरम्यान, काही भागात अज्ञानामुळे नागरिक तपासणी करण्यास घाबरत असले तरी सदर अज्ञान आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
दिव्या ठोंबरे
सरपंच, नडोदे ग्रुपग्रामपंचायत
Be First to Comment