सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔶🔷🔷🔶
खालापूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे विदारक चित्र आहे.सध्याची परिस्थिती पाहता रुग्णांवर याठिकाणी उपचार होत नाहीत.याकरिता लोधीवली येथील धिरूभाई अंबानी हॉस्पिटल शासनाने ताब्यात घेऊन तेथे नागरिकांसाठी सुसज्ज कोविड-१९ हॉस्पिटल बनवावे अशी खालापूर तालुक्यातील जनतेसह परीसरातील नागरिकांची मागणी आहे.
कोरोना या संसर्गजन्य विषाणूची दशहत जगभरात असताना तो आता ग्रामीण भागात शिरकाव करताना दिसत आहे.खालापूर तालुक्यातील लोधीवली येथे अंबानी ग्रुपचे धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आहे,कधीकाळी येथे उपचारही करतात.हे हॉस्पिटल सुसज्ज व मोठे असून राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर आहे.
सद्यस्थितीत खालापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात असल्याचे विदारक चित्र आहे.सध्या या हाॅस्पिटलात रिलायन्स कंपनीचे काही कामगार उपचार घेताना दिसतात ,यात बरेचशे कोरोना रुग्णांवर उपचारही होत असल्याचे समजते.शिवाय अनेक कोरोना रुग्ण बरे होऊन कामावर रुजू झाल्याचे विश्र्वसनीय वृत्त आहे.
दरम्यान रसायनी-मोहोपाडा,चौक परिसर,खालापूर,खोपोली व औद्योगिक क्षेत्रात रूग्णांची संख्या वाढत आहे.आणि येथील रुग्ण त्यांच्या परिस्थिती नुसार मुंबई,नवी मुंबई,पनवेल येथे दाखल होत आहेत,तर काहींची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ते त्यांना परवडणारे नाही,मग शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येतआहे,पण सद्यस्थितीत सर्वच रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना हाॅस्पिटलात दाखल करण्यासाठी जागा नाही अशी परिस्थिती आहे.
त्यामुळेच ब-याच रुग्णांचे उपचाराअभावी जीव जात आहे.तर काही रुग्ण घरीच उपचार घेताना आढळतात. खालापूर तालुक्यात सुसज्ज असे शासकीय व खाजगी रुग्णालय नाही,यासाठी मुंबई पुणे जुन्या महामार्गांवर लोधिवली येथे धीरूभाई अंबानी रुग्णालय आहे.
या हाॅस्पिटलचे रूपांतर कोविड-१९ मध्ये केल्यास तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळेल.शिवाय अनेक रुग्णांचे प्राणही वाचेल यासाठी प्रशासनाने तसेच राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन आवाज उठविण्याची गरज आहे.सध्याची कोविड परिस्थिती पाहता खालापूर तालुक्यातील नागरिकांसाठी लोधिवली येथील धिरुभाई अंबानी हाॅस्पिटल फक्त कंपनी कामगारांसाठी बांधिल न ठेवता सर्व नागरिकांसाठी कोविड -19 रुग्णालय म्हणून सुरू करावे अशी मागणी होत आहे.
यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्रित यावे शिवाय प्रशासनाने लोधिवली धिरुभाईं अंबानी हाॅस्पिटल हे भव्य स्वरुपात असल्याने तेथे चारशेपेक्षा जास्त बेडव्यवस्था करुन ताब्यात घ्यावे अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
Be First to Comment