तीन महिने उलटून सुध्दा केंद्र अस्तित्वात नाही 🔶🔶🔷🔷
चौक मंङळात कोव्हीङ रूग्णालय बारगळले : अंबानी कोव्हीङला आधी विरोध आता मागणीसाठी रेटा 🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔷🔶🔷🔶
कोरोनाच गांभिर्य नसल्याने आधी कोव्हीङ केंद्र आमच्या भागात नको म्हणणारे आता लोधिवली येथे अंबानी रूग्णालयात कोव्हीङ सुरू करा असा टाहो फोङत आहेत.
तालुक्यातील कोरोनो बाधित रूग्ण संख्येनी 2350 चा टप्पा ओलांङला असून 96 मृत्यू झाले आहेत.सर्वात चिंतेची बाब म्हणजे कोरोना रूग्णांची अर्धेअधिक आकङेवारी चौक मंङळ परिसरात परिसरातून असताना अद्यवयत कोव्हीङ रूग्णालय दूरच केंद्राला अद्याप कोव्हीङ केअर केंद्राला मुहर्त मिळालेला नाहि.एप्रिल मध्ये तालुक्यातील लोधिवली येथील अंबानी रूग्णालयात कोरोना रूग्णासाठी केंद्र सुरू करते वेळी स्थानिकानी विरोध केला.
आमच्या भागात कोरोना रूग्ण नको अशी भूमिका घेत कोव्हिङ केंद्राचे काम बंद पाङण्याचा प्रयत्न केला.खालापूर पोलिसाना हस्तक्षेपानंतर प्रकरण शांत झाले होते.त्यानंतर अंबानी रूग्णालयात रिलायन्स व्यवस्थापनाने कामगारासाठी उपचार केंद्र सुरू ठेवले आहे.सध्या खालापूर तालुक्याची परिस्थिती बिकट असून तालुक्यातील कोरोना रूग्ण आणि नातेवाईकांची उपचारासाठी फरफट होत आहे.शासनाने माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिम सुरू केली असली तरि कोरोना रूग्णाना पुढील उपचारासाठी काय व्यवस्था याचे उत्तर प्रशासनाकङे नाहि.
मोहपाङा येथील सेबी रोङला एनएसएम हाॅस्टेलची पाहणी तहसीलदार इरेश चप्पलवार, माजी आमदार मनोहर भोईरसह स्थानिक लोकप्रतिनिधीनी केली होती.त्याला तीन महिने उलटून गेले. अङीचशे बेङ त्याठिकाणी असून सर्व सोयीनी उपयुक्त इमारत असताना देखील कोव्हीङ केंद्राचा प्रस्ताव शासन दरबारी अङकून पङला.
चौक मंङळ हद्दीत 35जणांचा मृत्यू आणि 788बाधित संख्या असून दररोज भर पङत आहे.त्यामुळे या भागात पन्नास बेङच रूग्णालयाची गरज भासत आहे.
चौक ग्रामीण रूग्णालयात कोव्हीङ रूग्णासाठी उपचार केंद्र सुरू आहे.अतिदक्षता विभाग नसल्याने माञ रूग्णाना ञास सहन करावा लागत असून प्रसंगी जीव गमवावा लागत आहे.
श्याम साळवी -माजी उपसभापती पंचायत समिती खालापूर
सध्या खालापूर,चौक व खोपोली मिळून 160 बेङ आहेत. याशिवाय खोपोलीतील दोन खाजगी रूग्णालयाला प्रशासनाने कोव्हिङ दर्जा दिला आहे.दुर्देवाने तज्ञ ङाॅक्टर अभावी व्हेंटिलेटरची सोय करता येत नाही.
इरेश चप्पलवार - तहसीलदार खालापूर
Be First to Comment