Press "Enter" to skip to content

हिवाळा चिंता वाढवणार! फ्लू आणि कोविड १९ एकत्र उद्भवल्यास मृत्यूचा धोका दुप्पट
पाहा काय म्हणतात तज्ञ…

हिवाळा चिंता वाढवणार! फ्लू आणि कोविड १९ एकत्र उद्भवल्यास मृत्यूचा धोका दुप्पट
पाहा काय म्हणतात तज्ञ…

कोरोना व्हायरस आणि फ्लू या दोन्ही समस्या एकचवेळी उद्भवल्यास रुग्णाच्या जीवाला जास्त धोका असतो. ‘पब्लिक हेल्थ इंग्लँड’ (PHE) च्या रिपोर्टनुसार या दोन्ही इन्फेक्शनमुळे मृत्यूचा धोका दुप्पटीने वाढतो. याशिवाय तज्ज्ञांनी हिवाळ्यात या आजारांचा धोका वाढणार असल्याची सुचना दिली आहे. या रिपोर्टनुसार दोन्ही इन्फेक्शन एकाचवेळी उद्भवल्यास रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाला निरोगी रुग्णाच्या तुलनेत ६ टक्क्यांनी धोका जास्त असतो. ब्रिटनमध्ये याचवर्षी सगळ्यात मोठ लसीकरण केलं जाणार आहे.

या लसीकरण मोहिमेअंतर्गत तीन कोटी लोकांना टार्गेट ठेवलं जाणार आहे.

यात ६५ वयापेक्षा जास्त वयाचे लोक, गर्भवती महिला, गंभीर आजारांनी पिडीत असलेले लोक यांना प्राथमिकता दिली जाणार आहे. या वयोगटातील लोकांना लस दिल्यानंतरही लसीचे डोस उरल्यास ५० वर्षांवरील वयोगटातील लोकांना लस दिली जाणार आहे. हिवाळ्यात फ्लू किंवा इतर आजारांपासून स्वतःचा बचाव न केल्यास रुग्णसंख्या वाढू शकते.

एखाद्या व्यक्तीला फ्लू आहे की कोरोनाचं संक्रमण याची काळजी घ्यावी लागेल. PHE च्या रिपोर्टनुसार देशात २० जानेवारी ते २५ एप्रिल या कालावधीत एकूण २० हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अनेकांना रुग्णाला फ्लू आणि कोरोना व्हायरस या दोन्ही समस्या उद्भवल्या होत्या. यातील जास्तीत जास्त रुग्णांची स्थिती गंभीर होती. ४३ टक्के लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला होता. दरम्यान कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्याचं प्रमाण २७ टक्के होतं.

फ्लू एक व्हायरल इन्फेक्शन आहे. जे खोकण्यातून किंवा शिंकण्यातून पसरतं. कोविड १९ सुद्धा असाच पसरतो. फ्लूने संक्रमित असलेला व्यक्ती जवळपास एका आठवड्यानंतर बरा होतो. पण कोविड १९ असलेल्या व्यक्तीला या आजारातून बाहेर येण्यासाठी जास्तवेळ लागू शकतो. दरम्यान या दोन्ही आजारांमुळे ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांच्या जीवाला धोका असतो. हिवाळ्याच्या वातावरण फ्लू जास्त पसरतो. कोरोनाबाबत सांगता येणं कठीण आहे. पण दोन्ही आजारांची लक्षणं सारखीच आहेत. वैद्यकिय तपासणी केल्याशिवाय यातील फरक ओळखणं कठीण आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.