कोरोनाव्हायरसचा नाश करण्यासाठी आता आयोडीन चे शस्त्र
सिटी बेल लाईव्ह
कोरोनाव्हायरसचा नाश करण्यासाठी आपण हातांना सॅनिटायझर लावतो, एखादा पृष्ठभाग किंवा वस्तूही सॅनिटाइझ करून घेतो. शरीराच्या आत गेलेल्या कोरोनाला लक्ष्य करण्यासाठी लक्षणांनुसार वेगवेगळी औषधं कोरोना रुग्णांना दिली जात आहेत. मात्र ज्या नाकातोंडावाटे कोरोना शरीराच्या आत प्रवेश करतो आहे, तिथंच त्याचा नाश होऊ शकतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.
कोरोनाव्हायरस हा नाकातील रिसेप्टर एसीई-2 मार्फत पेशीच्या आत प्रवेश करतो आणि संक्रमित करतो.
त्यामुळे नाकातच या व्हायरसचा खात्मा करण्याचे प्रयत्न सुरू आहे, त्यादृष्टिने टटेस्ट करण्यात आल्या.
नाका-तोंडात कोरोनाव्हायरसचा नाश करता येऊ शकतो आणि तेदेखील आयोडिनने (Iodine), असा दावा अमेरिकेतील तज्ज्ञांनी केला आहे.
याआधी झालेल्या संशोधनात आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही आयोडिन कोरोनाविरोधात प्रभावी आहे, असा दावा फेटाळला होता. पण आता त्यावर पुन्हा संशोधन करण्यात आलं आहे.
आयोडिनने नाक आणि तोंड स्वच्छ केल्यास कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाची शक्यता कमी होते, संक्रमणापासून बचाव करता येऊ शकतो. असं युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसीनने केलेल्या संशोधनात दिसून आलं आहे.
शास्त्रज्ञांनी लॅबमध्ये कोरोनाव्हायरसच्या नमुन्यावर अँटिसेप्टीक पोविडोन-आयोडिन (पीव्हीपी- I) चं सोल्युशन टाकलं. 0.5%, 1.25%, 2.5% अशा वेगवेगळ्या प्रमाणातील आयोडिनचं सोल्युशन त्यांनी कोरोनाव्हायरसवर वापरून पाहिलं.
तिन्ही प्रमाणातील सोल्युशनचा परिणाम चांगला पाहायला मिळाला. 0.5 टक्के प्रमाणातच कोरोनाव्हायरस फक्त 15 सेकंदात निष्क्रिय झाला, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.
पीव्हीपी- I सार्स आणि मर्ससारख्या व्हायरसला निष्क्रिय करण्यात प्रभावी असल्याचं दिसून आलं. जेएएमए ऑटोसरींगोलॉजी हेड अँड नेक सर्जरीमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.

Be First to Comment