Press "Enter" to skip to content

मानव निर्मित कचरा उठतोय प्राणी मात्रांच्या जिवावर,प्लास्टिक बंदी कागदावरच


सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम) 🔷🔶🔶🔷

मानवाच्या हलगर्जीपणामुळे तसेच पर्यावरणाबबत असलेल्या उदासीनता यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन प्रचंड प्रमाणात बिघडत चालले असल्याने ते प्राणीमात्रांच्या जिवावर उठत असल्याचे पहावयास मिळत आहे.

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असून देखील त्यांचा बेमुसार वापर आपल्याकडून केला जात आहे. बाजारात जातांना कापडी किंवा कागदी पिशवी नेण्यास आपणास कमीपणा वाटतो.तर बाजारासाठी दुकानदाराकडुन पूरविल्या जाणाऱ्या प्लास्टिक पेशव्यांचे साम्राज्य वाढत असल्याचे दिसुन येता असुन प्लास्टिक बंदी हि कागदावरच राहिली असल्याचे दिसून येत आहें.
उकिरडे तर प्लास्टिक पेशव्यांनी भरलेले आहेत. परंतु त्या उकिरडयावर गुरे-ढोरे चरण्यासाठी येतात त्यावेळी उकिरडयातील खाद्यपदार्थां बरोबर प्लास्टिकचे हि भक्षण त्याच्यां कडून केल्याने त्याच्यां आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

आपला भारत देश कृषी प्रधान देश असल्याने बहुतांशी लोकांचा व्यवसाय शेती आहे.तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुधन व दुग्धव्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय ते करीत आहेत.
वाढते शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येच्या बेजबाबदार प्रवृत्तीचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. तर शेतीला पूरक असणाऱ्या पशुधनावर देखील त्याचा विपरित परिणाम होत आहे.

शेतीक्षेत्रात जरी आधुनिकीकरण झाले असले तरी सर्वच शेतकऱ्यांना यांत्रिक पद्धतीने नांगरणी करणे शक्य नसल्याने ते पुर्वपार पद्धतीनेच नांगरणीसाठी बैलजोडीचा वापर करित आहेत. शेतीला जोड व्यवसाय म्हणुन दुग्धव्यवसाय केला जातो.

परंतुु आपल्या निष्काळजीपणामुळे पर्यावरणातील ठिक ठिकाणी घाणीच्या साम्राज्यावरील प्लास्टिक गुरा-ढोरांच्या जिवावर उठले आहे. वातावरणातील प्लास्टिक इतर खाद्यपदार्थां बरोबर पोटाला गेल्याने गुरे-ढोरे किंवा इतर प्राणी मात्र भयंकर त्रास सहन करावा लागत आहे प्लास्टिक पिशव्या खाल्ल्याने पचन क्रियेसह रवंथ क्रियेवर देखील परिणाम होऊ लागला आहे तर शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांनी प्लास्टिक कचरा खाल्याने गुरे-ढोरे दगावण्याचे प्रकार घडू लागल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

यामुळे या प्लास्टिक कचरा रस्त्यात न टाकता खड्डा खोदून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी अशी शेतकरी वर्गातून मागणी केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.