Press "Enter" to skip to content

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष बालसंस्कार वर्ग संपन्न


पनवेल दि. ०१ (वार्ताहर) : शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष (२०२६-२७) निमित्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, लाईन आळी येथे बालसंस्कार वर्ग संपन्न झाले.

याचा कालावधी : १० दिवस असा होता. यात वयोगट : ३ ते १३ वर्ष मुले सहभागी झाले होते. यामध्ये श्लोक चित्रकला, मंत्रपठण, स्तोत्र, प्राणायाम सुर्यनमस्कार खेळ, गप्पा गोष्टी शिकवण्यात आल्या. यावेळी शहर प्रमुख प्रविण जाधव मा. नगरसेवक अच्युत मनोरे, शहर संघटिका उज्वला गावडे. विभाग प्रमुख प्रशांत नरसाळे. विभाग संघटिका. अश्विनी देसाई शाखाप्रमुख आदिल आवसेकर संतोष तळेकर आणि पालक वर्ग यांच्या उपस्थितीत सहभागी मुलांना बक्षीस वाटप करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.