निसर्ग संवर्धनची ओढ़ असलेले आवरे गावातील नवतरुणांनी केला पर्यावरण संवर्धनाचा दृढ निश्चय
सिटी बेल लाइव्ह / उरण #
आवरे गावातील सर्वच क्षेत्रात नावाजलेली संस्था कै मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आवरे तर्फे संस्थे तर्फे आवरे गावातील ऐतिहासिक वारसा असलेल्या व निसर्गरम्य अश्या मर्दनगड किल्ल्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाला उपयुक्त अशी वड , पिंपळ व चिंच ऑवला , सीताफल , करंजाच्या झाडाचे रोपण करण्यात आले.
वृक्षारोपणाच्या वेळी कै मधुकर ठाकूर प्रतिष्ठानचेअध्यक्ष कौशिक ठाकूर सर,महेश गावंड सर,ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील,सुयश क्लासेस चे निवास गावंड सर,विद्याधर गावंड सर,अमित म्हात्रे,शैलेंद्र पाटील,सचिव प्रेरणा ठाकूर,आवरे विकास मंचचे अध्यक्ष करण ठाकूर, उपस्थित होते
सदर वृक्षारोपण करण्यासाठी शंकर पाटील,दिपेश ठाकूर,प्रमोद ठाकूर,बळवींद्र गावंड, अस्मित गावंड,समीर गावंड,दिपू गावंड,यश पाटील यांनी मेहनत घेतली.
Be First to Comment