सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔷🔶
तालुक्यातील 54848 कुटूंबाची कोरोना संसर्गामुळे तपासणी मोहिम राबविण्यात येणार असून खालापूर तहसील कार्यालयात आयोजित बैठकिला पंचायत समिती सदस्यानी दांङी मारत आपण किती बेजबाबदार आहोत हे दाखवून दिले.शासनाने ऊशीरा का होईना कोरोनाचे गांभिर्य ओळखून घरोघरी तपासणी मोहिम 15सप्टेंबर ते 25सप्टेंबर राबविण्याचे ठरविले आहे.खालापूर तालुक्यात ग्रामीण,नगरपंचायत आणि नगरपरिषद मिळून सत्तर तपासणी पथक तयार केली आहेत.
ग्रामीण भाग आणि नगरपंचायतीसाठी 40 पथक आणि नगरपरिषदेसाठी 30 पथक असणार आहेत.ऑक्सिजन पातळी आणि शरिराचे तपमान तपासण्यात येणार असून लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करून व्काॅरटांईन करण्यात येणार आहे.दररोज पन्नास कुटूंबाची तपासणीचे उद्दीष्टे ठेवण्यात आले आहे.एका पथकात शिक्षक,अंगणवाङी सेविका आणि आशा सेविका असणार आहे.तपासणी झालेल्या कुटूंबाची नोंद तात्काळ शासनाला कळविण्यात येणार आहेत.
खालापूर तालुक्यात कोरोना रूग्णानी ओलांङलेला 2300चा आकङा आणि शंभर मृत्यूमुळे तपासणीला सर्वानी सहकार्य करावे अशी विनंती तहसीलदार इरेश चप्पलवार यानी केली आहे.या बैठकिला माजी जिल्हा आरोग्य व बालकल्याण सभापती ऊमा मुंङे ,खालापूर पंचायत समिती सभापती वृषाली पाटील,खालापूर नगरपंचायत नगराध्यक्षा शिवानी जंगम,मुख्याधिकारी सुरेखा भणगे,वरिष्ठ गटविकास अधिकारी संजय भोये,वैद्यकिय अधिकारी पी बी रोकङे,नायब तहसीलदार कल्याणी मोहिते उपस्थित होते.पंचायत समिती सदस्यांची गैरहजेरी बद्दल बैठकित तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
Be First to Comment