सिटी बेल लाइव्ह / रसायनी-राकेश खराडे 🔷🔶🔷🔶
गेल्या सहा ते सात महिन्यांपासून आपण सर्वंजण कोरोना विषाणूशी लढाईं लढत आहोत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून १५ सप्टे.गरोजी महाराष्ट्र शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ही मोहिम राबविण्यात सुरूवात केली असून या मोहीमेला नागरिकांकडूनही उत्स्फुर्तं प्रतिसाद मिळत आहे.
तालुक्यात कोरोनाचा सर्वांधिक प्रादुर्भाव वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत दिसून येतो.यासाठी ग्रामपंचायतीने विविध उपाययोजना करुन जनजागृती केली आहे.परंतु गणेशोत्सवानंतर पुन्हा कोरोनाचा फैलावर वाढला असून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ही मोहिम राबविण्यात येत आहे.
यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून सहा विभागांसाठी विविध पथके नेमण्यात आली आहेत.यावेली दुर्गांमाता गणेशनगर विभागात माजी सरपंच संदिप मुंढे, ग्रामपंचायत सदस्य संतोष मैदर्गींकर , आरोग्य अधिकारी म्हात्रे व आरोग्यसेविका यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाची माहिती घेऊन आॅक्सिमीटरच्या साहाय्याने आॅक्सिजन पातळी तपासण्यात आली.तसेच कुटुंबातील सदस्यांना कोणता आजार,कोरोनासंदर्भांत काही लक्षणे आहेत का? याची माहिती घेतली.
या महत्वकांक्षी योजनेस शासनाच्या आरोग्य तपासणी योजनेला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री आदीती तटकरे यांनी केले आहे.माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम साथ नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाची असून नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन शासकीय यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
Be First to Comment