Press "Enter" to skip to content

ऑनलाईन कर्तव्य बजावणारे शिक्षकच कोरोनाच्या विळख्यात

रायगड मधील अनेक शिक्षक कोरोनाग्रस्त 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔶🔷🔷🔶

राज्यातील कोरोना चा संसर्ग झपाट्याने वाढत असून या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये सद्यस्थितीत शाळा, महाविद्यालये शैक्षणिक संस्था बंद ठेवून शिक्षकांनी घरून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र बऱ्याच शैक्षणिक संस्था तसेच महाविद्यालयांमध्ये शिक्षकांना दररोज शाळेत बोलावले जात असल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे.

शाळेत आलेल्या शिक्षकांकडून इतर कामे व प्रवेश प्रक्रिया तसेच अभ्यास जी क्रिया घरून ऑनलाइन करावयाची आहे ती शाळेतून करून घेतली जात आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेतील विद्यार्थ्यांइतकाच महत्त्वाचा घटक असणारे शिक्षक मात्र आता कोरोना च्या विळख्यात सापडले आहेत.

दरम्यान रायगड जिल्ह्यातील अनेक शिक्षक कोरोनाग्रस्त झालेले आढळून आले आहेत.

शासकीय धोरणानुसार आवश्यकता असल्यासच शिक्षकांना शाळेत बोलवा असे असतांना काही ठिकाणी शिक्षकांना दररोज उपस्थिती बंधनकारक केल्या केल्याचे दिसून येत आहे परिणामी शाळेत शिक्षकांची गर्दी होऊन सगळीकडे सोशियल डिस्टंसिंगचा फज्जा उडत आहे.

अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण सुरू असताना विनाकारण शाळांमध्ये सर्व शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक न करता आवश्यक त्या सूचना शिक्षण विभाग रायगड याने निर्गमित कराव्या अशी मागणी शिक्षकांमधून जोर धरू लागली आहे.

नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार ५० टक्के शिक्षकांना - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये बोलविता येणार आहे. या सूचनांवर राज्याच्या शिक्षण विभागाकडून अद्याप तरी काही सूचना नसल्या तरीही या आधी त्या देण्यात आल्या आहेत. रायगड मधील शाळा, महाविद्यालयांमध्ये कार्यरत असणारे अनेक शिक्षक एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यामध्ये प्रवास प्रवास करत असून त्यामुळे रायगड मधील शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या वेढ्यात सापडत आहेत.

दरम्यान ह्या कोरोनाच्या जीवघेण्या आजारात एखादा शिक्षक बळी पडल्यास त्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न शिक्षक वर्गाला पडला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.