सिटी बेल लाइव्ह / खोपोली (संतोषी म्हात्रे ) 🔷🔶🔷🔶
गणपती उत्सवा नंतर शहरात आणि ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव मोठ्या वेगाने होतांना पहायला मिळत आहे. याला ब्रेक लावण्यासाठी खोपोली नगरपालिकेने आता दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
खोपोली नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही व्यक्तिने आपल्या तोंडाला मास्क न लावला असल्यास त्यावर ५००/- दंड करण्यात येणार आहे तर जे लोक सुरक्षित अंतर ठेवण्याचा नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर १०००/- रूपये दंडाची कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेच्या दंडात्मक कारवाईचे सर्वत्र स्वागत होतांना दिसत आहे.
खोपोली नगरपालिकेच्या हद्दीत गेल्या आठ-दहा दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहेत. कोरोना बाबतची भिती कमी झाल्याने लोक सुध्दा रस्त्यावर मोकाट फिरतांना दिसत आहेत. मात्र कोरोनाचा वाढता फैलाव हा अन्य लोकांच्या जिवीतास धोका पसरवू शकतो याची काळजी नसलेल्या या मोकाट फिरणाऱ्या लोकांना चाप बसविण्यासाठी खोपोली नगरपालिकेने कडक कारवाईचे पाऊल उचलले आहे.
आता खोपोली नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कुठेही तोंडाला मास्क न लावता कोणी फिरतांना दिसल्यास त्याला ५००/- दंडाची शिक्षा करण्यात येणार आहे. या शिक्षेत कोणालाही सुट मिळणार नसल्याने या शिक्षेचा कोरोना रोखण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो.त्याच प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी कोणी सुरक्षित अंतर ठेवण्याचा नियम पाळणार नसेल तर त्यावर सुध्दा कडक कारवाई करत १०००/- रूपयाचा दंड आकारण्यात येणार असल्याने सार्वजनिक ठिकाणची गर्दी सुध्दा कमी होण्याची शक्यता आहे. लोकांनी योग्य काळजी घेतल्यास कोरोना नक्कीच हद्दपार होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Be First to Comment