ऍड.प्रविण ठाकूर यांची मागणी :
पालकमंत्री आदिती तटकरे यांना दिले निवेदन 🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / रायगड-अमूलकुमार जैन 🔷🔷🔶🔶
जिल्हा सामान्य रूग्णालय येथील नियोजीत शंभर खाटांचे कोव्हीड रूग्णालय व जिजामाता हाॅस्पीटल येथील कोव्हीड रूग्णालय या दोन्ही ठिाकाणी सध्याची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता तातडीने 40 नर्स व 40 वाॅर्डबाॅय तसेच आवश्यक डाॅक्टर्स यांची पदे भरण्यासाठी तातडीने जाहिरात प्रसिध्द करावी अशी मागणी रायगड जिल्हा काॅंग्रेसचे उपाध्यक्ष ऍड.प्रविण मधुकर ठाकूर यांनी आज अलिबाग येथे जिल्हयाच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेवून केली आहे.
यावेळी त्यांचे सोबत ऍड.प्रफुल्ल पाटील, ऍड.अमोल पाटील, अफ.विद्देश भोनकर, मावळा प्रतिष्ठानचे मानस कुंटे, संग्राम घरत इ.उपस्थित होते.
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १०० खाटांच्या अद्ययावत कोव्हीड रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे. यात ४० व्हॅन्टीलेटर्स आणि सर्व खाटांना ऑक्सिजन पुरवठयाची सुविधा उपलब्ध असणार आहे. कंपन्यांच्या सिएसआर फंडातून या रुग्णालयांची उभारणी केली जात आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या झपाटयाने वाढत आहे.
जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा 17 सप्टेंबरपर्यंत 3९ हजारावर पोहोचला आहे. मात्र 32 हजार रुग्णांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात जवळपास सहा हजारावर करोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. तर एक हजार 68 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांची झपाटयाने वाढणारी संख्या लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत.
शासनाचे प्रयत्न सर्व स्तरावर अतिशय चांगल्या प्रकारे सुरू असले तरी ब-याच ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी यांची संख्या अपुरी असल्याच्या तक्रारी जनतेमधून येत आहेत. त्यासाठी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १०० खाटांच्या अद्ययावत कोव्हीड रुग्णालयासाठी 25 नर्स व चतुर्थश्रेणी वाॅर्डबाॅय 25 तसेच जिजामाता हाॅस्पीटल कोव्हीड सेंटर येथे 15 नर्स व 15 वाॅर्डबाॅय यांची भरती तात्पुरत्या स्वरूपात तीन महिन्यांसाठी केल्यास जिल्हा मुख्यालयी कोव्हीड रूग्णांच्या उपचारांमध्ये मदत होवू शकेल.
जिल्हयाच्या पालकमंत्री म्हणून आदितीताई तटकरे यांनी यासाठी तात्काळ जाहिरात प्रसिध्द करण्याच्या सूचना निर्गमीत कराव्यात अषी विनंती ऍड.प्रविण ठाकूर यांनी केली आहे.
Be First to Comment