Press "Enter" to skip to content

गुड न्यूज : उरणला लवकरच कोव्हीड हॉस्पिटल सुरू होणार

सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔶🔷

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उरणमध्येही कोरोना महामारीचे संकट आहे. कोरोना महामारीवर मात करण्यासाठी उरणमध्ये कोव्हीड हॉस्पिटलची कमतरता प्रामुख्याने जाणवत होती. यासाठी अनेकवेळा प्रयत्न करून मार्गी लागत नव्हता. मात्र काल मंत्रालयात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी तातडीने आदेश देताच सिडकोच्या अधिकारी वर्गांनी आज पहाणी करून पुढील कार्यवाही सुरू केली. त्यामुळे येत्या काही दिवसांत उरणमध्ये कोव्हीड हॉस्पिटल लवकरच सुरू होणार असल्याची माहिती माजी आमदार मनोहरशेठ भोईर व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी दिली.

बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उरण पनवेल महाविकास आघाडी बैठक संपन्न झाली. याबैठकीत महाविकास आघाडीचे बबनदादा पाटील, माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, उरण सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांनी इतर समस्यांबरोबर कोरोनाच्या महामारीत उरणमध्ये प्रामुख्याने कोव्हीड हॉस्पिटल नसल्याने कोरोना रुगणांना पुढील उपचारासाठी उरण बाहेर हलवायला लागतो. त्यामुळे रुग्णांचा जीव जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तरी उरणमध्ये कोव्हीड हॉस्पिटल त्वरित सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. याची मंत्री महोदयांनी त्वरित दखल घेऊन सिडकोला कोव्हीड हॉस्पिटल सुरू करण्याचे आदेश दिले होते.

बैठकीत दिलेल्या आदेशानुसार आज सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उरण परिसरातील सिडको कडून अद्यावत १०० बेडचे कोव्हीड हॉस्पिटल उभारण्याकरिता बोकडविरा येथील सिडको प्रशिक्षण केंद्र व केअरपॉइंट रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून ज्या उणीवा आहेत त्याबाबत सिडकोच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पाहाणी करून त्याचा अहवाल त्वरीत सादर करणे बाबत आदेश दिला होता. त्याप्रमाणे पहाणी करण्यात आली.

सध्या उरण पनवेल येथे कोरोना या माहामारीचे वाढते रुग्ण पहाता येथे १०० बेडचे कोव्हीड सेंटर 20 आसीयु बेड व्हेंटीलेटरसहित हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करण्यात येणार आहे. सदर कोव्हीड हॉस्पिटल सर्व नागरिकांसाठी खुले करण्यात येईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

यावेळी उरण पनवेल महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, सिडकोचे डॉ.बाविस्कर, कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, सरकारी रुग्णालयाचे डॉ. मनोज भद्रे, उरण सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार, किरीट पाटील, राजेंद्र मढवी सर, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.