Press "Enter" to skip to content

पाली प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन जनरेशन युनिटची भेट

ग.बा. वडेर पाली हायस्कुल च्या    1989 वर्ष दहावीच्या बॅचकडून कोव्हीड रुग्णांना “जीवन वायु”

सिटी बेल लाइव्ह / पाली /रायगड (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔶🔷

कोव्हिडं 19 च्या पाश्वभूमीवर  सुधागड तालुक्यातील ग.बा. वडेर हायस्कुल पालीच्या  दहावीच्या 1989 वर्षीच्या बॅचकडून सामाजिक बांधिलकी जपत पाली प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन जनरेशन युनिटची भेट दिली.

सुधागडातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करीत विविध सामाजिक सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते  स्वयंस्फूर्तीने पुढे येत आपापल्या परीने आवश्यक ते सहकार्य करीत आहेत. याबरोबरच  आरोग्य सोयी सुविधांशी निगडित वस्तूरूपी मदतीचा हात देत आहे.  पाली शहर व सभोवतालच्या  परिसरातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव  व रुग्णाला येणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता लक्षात घेवून ग.बा.वडेर हायस्कुल मध्ये शिक्षण घेतलेल्या 1989 च्या विद्यार्थ्यांनी  एकत्रित येत प्रशासनाला आवश्यक ते  सहकार्य करण्याची भूमिका घेतली. व  यासाठी  एकूण 39 विद्यार्थी एकत्र आले. 

सध्याच्या वातावरणात अत्यंत उपयुक्त ठरणारे ऑक्सिजन जनरेशन युनिट खरेदीकरिता निधी गोळा करण्यासाठी श्री. ॲड.नितीन शेवाळे, नोवेल  चिंचोलकर, उपेंद्र कानडे, शैलेश सोनकर,  अतुल पाचपांडे , गिरीश शिंदे, बाळा खंडागळे , किरण दुर्गे,सौ.योगिता द्रविड,  यांनी पुढाकार घेतला. यावेळी बोलताना पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी कोरोनासारख्या राष्ट्रीय संकटात प्रत्येक नागरिकाने आपापली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडणे आवश्यक आहे. या काळात प्रशासनाला सुधागड वासीयांचे चांगले सहकार्य लाभत आहे.

दिलीप रायन्नावार ,पाली सुधागड तहसीलदार

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी उपक्रम हाती घेत ऑक्सिजन जनरेशन युनिट आरोग्य केंद्राला भेट दिले. या युनिटचा  उपयोग रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी होईल. असे सांगत  या सर्व टीमचे पाली  तहसीलदारांनी कौतुक करून आभार मानले.  

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.