सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔷🔶🔶🔷
सर्वत्रच कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना पाच महिने या महामारी पासून दूर असलेल्या माथेरान मध्ये सुध्दा ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाने शिरकाव केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
१८ मार्च रोजी माथेरान लॉक डाऊन केल्यामुळे सर्व नागरिक बिनधास्तपणे वावरत होते. परंतु केवळ पर्यटनावर अवलंबून असल्याने इथल्या कष्टकरी लोकांच्या उदरनिर्वाहासाठी २ सप्टेंबर पासून माथेरान अनलॉक करण्यात आले त्यामुळे काहीशा प्रमाणात पर्यटक हजेरी लावत आहेत.
पर्यटकांचा अधिक भरणा नसताना देखील इथे गणेशोत्सव काळापासून कोरोनाने शिरकाव केल्यामुळे दरदिवशी दोन ते चार कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.मागील आठ दिवसापासून दररोज एक मृत्यू होत आहे.त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा माथेरानला लॉक डाऊन करावे अशी मागणी सुध्दा पुढे येत आहे.परंतु असे लॉक डाऊन तरी कितीवेळा करणार हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हा आजार आणखीन दोन वर्षे तरी अनुभवायला मिळणार आहे यात शंका नाही.त्यामुळे निदान दोन वर्षे तरी कोरोना सोबतच सर्वाना आपल्या कुटुंबाला आधार देणे क्रमप्राप्त बनले आहे.ही साखळी तोडण्यासाठी शक्यतो कामाशिवाय कुणी घराबाहेर न पडल्यास त्याचप्रमाणे प्रशासनाने सूचित केलेल्या नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे.
आगामी पर्यटन हंगाम लक्षात घेता आणि कोरोना सोबतची लढाई करताना लॉक डाऊन केल्यास वारंवार कुणीही दानशूर सातत्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार नाहीत. की घोड्यांना खाद्य पुरवठा करणार नाहीत ही लढाई सर्वांना कोरोना सोबत लढायची असल्याने माथेरान अनलॉक असतानाच इथे वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी काही दिवस सर्वांनी घरात राहिल्यास आपोआप ही साखळी तुटणार आहे.त्यासाठी सर्व नागरिकांच्या सहकार्याची यावेळी गरज असल्याचे जेष्ठ नागरिक बोलत आहेत.
Be First to Comment