Press "Enter" to skip to content

कोप्रोली येथिल ग्लोबिकॉन गोदामात रक्तचंदनाचा साठा- डीआरआयची कारवाई

सिटी बेल लाइव्ह / जेएनपीटी ( वार्ताहर ) 🔷🔶🔷🔶

जेएनपीटी बंदरातून चोरट्या मार्गाने निर्यात करण्यासाठी आणलेले कोट्यावधी रूपयांचे रक्त चंदन डिआरआय (राजस्व आसूचना निदेशनालय) जप्त करण्यात आले असल्याचे विश्वसनिय सुत्रानी माहिती दिली.बुधवार दि१६ रोजी कोप्रोली येथिल ग्लोबिकॉन गोदामात ही कारवाई करण्यात आली आहे. विश्वसनिय सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी उशिरापर्यंत डिआरआयची ही कारवाई सूरू होती.

यामध्ये डीआरआयच्या अधिकाऱ्यांना एक रक्तचंदनाने भरलेला कंटेनर सापडल्याची माहिती आहे.त्यामुळे जेएनपीटी पुन्हा एकदा रक्तचंदन तस्करीचे केंद्र बिंदू ठरू पहात आहे. उरण तालुक्यातील ग्लोबिकॉन गोदामात यापूर्वी जानेवारी २०१८ मध्ये एसीमध्ये लपवून १५ किलो

सोन्याच्या लगडी आणल्याची तस्करी डीआरआयने पकडली होती आत्ता पुन्हा एकदा याच गोदामात रक्तचंदनाचा साठा सापडल्याने हे गोदाम म्हणजे तस्करांचा अड्डा तर नाही ना अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. आज डिआरआयने केलेली कारवाई ही अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती.

कंपनीमध्ये असलेल्या कामगारांना बाहेर येवू दिले जात नव्हते तर बाहेरच्या कामगारांना आतमध्ये सोडले जात नव्हते. स्थानिक पोलिसांना देखिल कारवाई पासून दुरू ठेवण्यात आले होते. या बाबत कंपनीतल्या सुत्रांनी कंपनीत एका कंटेनरमध्ये रक्तचंदनाचा साठा सापडला असल्याचे सांगितले.

याबाबत डीआरआयच्या न्हावाशेवा रिजनल यनिट कार्यालयामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता
मुंबई झोनल युनिट कडून ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दिली.ग्लोबिकाँन कंटेनर यार्डचे जी एम लक्ष्य तडाडीकर यांना रक्तचंदनाच्या कारवाई संदर्भात विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.