एकूण बाधीत 340, तर 16 जणांचा मृत्यू 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) 🔶🔷🔷🔶
सुधागड तालुक्यात मागील चार दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची घट झाली होती. मात्र मंगळवारी कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. सुधागड तालुक्यात मंगळवारी (दि.15) रोजी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 8 जण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावताना दिसतोय.
जिल्हा प्रशासनाबरोबरच तालुका प्रशासन व आरोग्य यंत्रणेपुढे कोरोनाला रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
सुधागड तालुक्यात आता कोरोनाचे 340 रुग्ण झाले असून आत्तापर्यंत स्वतःची इच्छाशक्ती , आत्मविश्वास व आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नाने कोरोनाचे 260 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आणि 64 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. आवश्यक साधनसामग्री व यंत्रणा देखील वापरात आणली जात आहे.एकूणच प्रशासन योग्य प्रकारे काम करत आहे. घरात कुणी आजारी असल्यास त्वरित उपचार घ्यावेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि शासन नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे.
Be First to Comment