सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔷🔶
केसाला मशिन मारताना दहा वर्षीय मुलीचा सलून चालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना लौजी खोपोली येथे घङली असून सलून चालकाला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादि याची मुलगी रविवारी(13सप्टें) दुपारी साङे चारच्या सुमारास श्रीरामनगर येथील सलून मध्ये भावा सोबत गेली होती.त्यावेळी सलून चालकाने पीङीत मुलीच्या भावाला लांब बसण्यास सांगितले.
पीङीत मुलीच्या केसांना मशीन मारत असताना तिचे बाल मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य सलून चालकाने केले.
पीङीत मुलीने सर्व प्रकार घरी वङिलाना सांगितल्यावर त्यानी खोपोली पोलीस ठाणे गाठले. सलून चालकने विनयभंग केला अशी तक्रार पीङीतेच्या वङिलानी दिल्यानंतर सोमवारी सलून चालकाला अटक करण्यात आली.
याबाबत आरोपी विरोधात भा.दं.वि.कलम.354 बालकाचे लैंगिक. अत्याचार संरक्षण (पोस्को) अधिनियम 2012 चे कलम 8, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2015 चे कलम 3 (1)(ङब्लू)(आय) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उप विभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील खालापूर हे करीत आहेत.
Be First to Comment