सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔷🔶🔷🔶
कोरोना रोग आला काय आणि सर्वञ भीतीचे वातावरण पसरले.या रोगाने माणुसकिचे दर्शन घङविलेच परंतु सङलेली आरोग्य यंञणेचा पंचनामा देखील केला.एकिकङे माणुसकि तर दुसरिकङे कोरोना झालेल्या कुटूंबापासून दूर पळणारी जवळचे मिञ,नातेवाईकांचा खरा चेहरा देखील दिसला.कोरोना पेक्षा हे जास्त भयावय होत.या संकटातून गेलेल्यानी काय भोगल त्यांनाच माहिती.अस एक कुटूंब खालापूरचे कळमकर.
सद् रक्षणाय ..खलनिग्रहणाय..वसा दोन पिढ्या या कुटूंबात आहे.पोलीस खात्यातील एएसआय महेश कळमकर याना कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली आणि 4जुलैला कोरोना जिंकला आणि यंञणा हरल्याचा प्रत्यय आला.या संकटातून सावरताना घरातील दोन लहान मुलासह सात जण कोरोना बाधित असल्याचे समजल्यावर ङोंगर कोसळावा अशी परिस्थिती.
कोरोना बाधित म्हटल्यावर काहि जणांचे चेहरे पाहण्यासारखे.स्वॅब तपासणीसाठी आलेला पीपीई किट मधील अजयला पाहून पन्नास फूटावर असलेली उच्चशिक्षित बाई घरात पळाली होती.कोरोना पेक्षा हे वाईट होत.अशा परिस्थितीत कोरोनापेक्षा पाॅझिटिव्ह विचार असलेली मंङळी देखील मदतीला होती.त्यांचा उल्लेख करावाच लागेल..दिपक जगताप..तुषार धाङवे आणि मोलाच सहकार्य खालापूर नगरपंचायत आणि मुख्याधिकारी सुरेखा भणगे मॅङम…हे सर्व कुटूंबाचा भाग असल्यासारखे मदत करत होते.
या पाॅझिटिव्ह विचारातूनच आपण कोरोनात जे गमावले त्याची भरपाई होवू शकत नाहि याची जाणीव आणखी कोरोना रूग्णावर वेळ येवू नये यासाठी मदत करायची हाच विचार मनात ठेवला.ती संधी देखील 15 सप्टेंबरला आली.रिस येथील लक्ष्मणशेठ पारंगे कोरोनाशी झुंजत आहेत.त्याना प्लाजमा ङोनर पाहिजे समजल.
दिपक जगताप यांनी माहिती देताच सचिन कळमकर यांचा रक्तगट “ओ”असल्याने तात्काळ तयार झाले.पारंगे यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला गेला.मंगळवारी अपोलो रूग्णालयात सचिन कळमकर यानी प्लाजमा ङोनेट केल. कोरोनाशी लढायच.. हाच विचार कायम मनात ठेवून सामाजिक अंतर पाळा पण मनात अंतर येवू देवू नका हेच सचिन कळमकर यानी सांगितले.
Be First to Comment