सिटी बेल लाइव्ह / आरोग्य प्रतिनिधी / नवी मुंबई : 🔶🔷🔷🔶
डॉ. कनोरिया इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स होलिस्टिक हेल्थकेअरच्या सहकार्याने पनवेल शहरातील सुअस्थ मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलने नॉन-कोविड रूग्णांवर उपचार सुरू केले. २७ ऑगस्ट पासून पनवेल महानगरपालिकेने सुअस्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नॉन कोविड रूग्णांसाठी अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. जुलै २०२० पासून रुग्णालयाने २०० हून अधिक कोविड रूग्णांवर यशस्वीरित्या उपचार केले आहेत.
ब्रिटनमधील यकृत प्रत्यारोपण सर्जन आणि आरोग्यसेवा उद्योजक डॉ. संजीव कानोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुअस्थ मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हे नवी मुंबई व पनवेलकरांच्या आरोग्यसेवेसाठी उत्कृष्ट पर्याय ठरत आहे. सुअस्थ मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हे नवी मुंबई परिसरातील एक अग्रगण्य आरोग्य सेवा केंद्र असून यामध्ये ३५० बेड, नवजात बाळाची काळजी घेणारे आधुनिक तंत्रज्ञान, १३ ऑपरेशन थिएटर, २४ तास सेवा देणारे अपघात आणि आपत्कालीन विभाग तसेच गरोदर माता व आयव्हीएफ युनिटसाठी समर्पित ऑपरेशन थिएटर आहे. सुअस्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक पायाभूत आरोग्य सुविधा, प्रगत इमेजिंग रेडिओलॉजी विभाग, जागतिक दर्जाचे डायलिसिस मशीन तसेच उत्कृष्ट फिजिओथेरपी विभाग असलेल्या अशा अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध केल्या आहेत.
कोविड व्यतिरिक्त इतर उपचार आणि सेवा घेणाऱ्या रुग्णांना म्हणजेच नॉन कोविड रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र प्रवेशद्वार आणि गंतव्य द्वार उपलब्ध आहे पनवेल महानगरपालिका (पीएमसी) ने ठरवलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करत सुअस्थ हॉस्पिटल नियमित स्वच्छता व परिसराची काळजी घेत आहे.
सुअस्थ हॉस्पिटलच्या अधिकृत प्रवक्तया डॉ. वनिता मांडे सांगतात, “ आमच्या रूग्णालयात कोविड रूग्णांवर उपचार केल्यानंतर आम्हाला आता नॉन कोविड रुग्णांसाठी ओपीडी, डायलिसिस, फिजिओथेरपी आणि रोगनिदानविषयक सुविधा उघडण्यास आनंद झाला आहे.
रुग्णांना नवीनतम आणि सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि उपकरणांसह परवडणारे आणि प्रगत उपचार देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, विशेषत: कोविड सारख्या भयंकर महामारीमध्ये लोकांमध्ये आरोग्य विषयक असलेल्या चींतेबाबत आम्ही अवगत आहोत म्ह्णूनच आम्ही नॉन-कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व महानगर पालिकेच्या सर्व सूचना पाळत आहोत. ”
Be First to Comment