Press "Enter" to skip to content

सोन्याची खाण समजल्या जाणार्‍या उरणमध्ये ऑक्सिजन बेडची कमतरता


सिटी बेल लाइव्ह / उरण (घनःश्याम कडू) 🔶🔷🔶🔷

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रायगड जिल्ह्यातही कोरोना पॉझिटीव्ह पेशंट मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहे. उरण तालुक्यातही कोरोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. उरण ही सोन्याची खाण म्हणून समजली जात असताना मात्र एखाद्या कोरोना पॉझिटीव्ह पेशंटचा ऑक्सिजन 90 च्या खाली आल्यानंतर त्याला उरणमध्ये सुविधा देणारे कोणतेही हॉस्पिटल उपलब्ध नाहीत ही उरणकरांची शोकांतिका आहे.

राज्यासह रायगड जिल्ह्यातही कोरोनाने हाःहाःकार माजवला आहे. दररोज जिल्ह्याचा कोरोना आकडा बघितला की त्यामध्ये पॉझिटीव्ह व मयतांचा आकडा वाढत असल्याचे चित्र दिसते. उरण तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. जिल्ह्यापेक्षा उरण तालुक्यात सर्वाधिक उत्पन्नाचे स्तोत्र म्हणजे कंपन्या आहेत. त्यामुळे उरणला सोन्याची खाण असे संबोधले जात आहे. मात्र या कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी अनेक सुविधांची कमतरता आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोरोना पॉझिटीव्ह पेशंटची श्‍वासोंश्‍वास म्हणजे ऑक्सिजन लेव्हल ही 90 च्या खाली आल्यानंतर पुढील उपचार करण्यासाठी ऑक्सिजन बेडची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्वरित उरण बाहेर हलविण्याशिवाय पर्याय रहात नाही.

अशा कोरोना बाधीत पेशंटला दुसर्‍या ठिकाणी हलविण्याचा प्रयत्नात काहींना आपले जीव गमवावे लागले आहे.
कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असून इतर ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र उरण ही सोन्याची खाण समजली जात असेल तर उरणमधील कोरोना बाधीत पेशंटला ऑक्सिजन लेव्हल 90 च्या खाली आली असेल त्या पेशंटला पुढील उपचार करण्यासाठी उरणमध्ये कोणतीही सुविधा नाही.

यावरून सोन्याच्या खाणीतील उरणकरांची शोकांतिका किती बिकट आहे हे उघड होते. आता तर कोरोना आदिवासी बांधवांच्या वाडीवर पसरत अनेक कोरोना पॉझिटीव्ह पेशंट सापडू लागले आहेत. त्यामुळे उरणमध्ये आता कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. या आदिवासी बांधवांची परिस्थिती बिकट आहे. त्यात उपचारासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी ऑक्सिजन बेडची व्यवस्था वेळीच केली नाहीतर उरणमधील अनेक गोरगरिबांचा ऑक्सिजन बेड अभावी मृत्यू होण्याच्या घटनांत वाढ झाल्याशिवाय रहाणार नाही. अशी धक्कादायक माहिती कोरोना बांधितांवर उपचार करणार्‍यांपैंकी काहींनी ही माहिती आमच्या पर्यंत
पोहचवली आहे.

जेणेकरून सोन्याची खाण समजल्या जाणार्‍या उरण नगरीतील गोरगरीब जनतेचे ऑक्सिजन बेड अभावी मृत्यू होऊन नये हाच एकमेव उद्देश त्यांचा आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.