सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔶🔷
उरण तालुक्यातील भेंडखळ गावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शारीरिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढा कशा प्रकारे बनवायचे व कशाप्रकारे सेवन करायचे याचे मार्गदर्शन आज करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार सर (उरण) आणि राजेंद्र मढवी सर (जसखार)यांनी कोरोना काळात शारीरिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कशाप्रकारे काढा याबाबत ते मार्गदर्शन करीत असतात. भेंडखळ गावात कोरोनाने १० जणांच्या वरती बळी गेले आहेत. त्यामध्ये एकाच घरातील आई वडील व मुलाचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे संपूर्ण गाव शुक्रवार दि. ११ ते दि. १८ सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे.
भेंडखळ गावातील ग्रामस्थांची भीती दूर करण्यासाठी त्यांचे शारीरिक आरोग्य उत्तम राहून कोरोना-19 विषाणूस कुणीही बळी पडू नये तसेच त्यांची शारीरिक प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी “आयुर्वेदिक काढा” बनविण्याचे प्रात्यक्षिक संतोष पवार व राजेंद्र मढवी यांनी करून दाखविले. त्याचबरोबर याचे सेवन सकाळी व संध्याकाळी असा दिवसातून दोन वेळाच करावा. याचा सेवन जास्तवेळ केलातर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर जाणवू लागतो अशी माहिती ग्रामस्थांना दिली. फिघट अंगेंस्ट कोरोना ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम घरोघरी पोचविण्यासाठी आणि ग्रामस्थांचे शरीर स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी मोलाची कामगिरी केली. या ग्रुप मधील सर्व सदस्यांचे आणि या कार्यक्रमासाठी सढळ हस्ते आर्थिक मदत पालवी सामाजिक संस्था, श्री. विठोबा देव देवस्थान ट्रस्ट, तसेच श्री. सदिच्छा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांनी केली.
सदर काढ्याचे सेवन नियमित केल्याने कोरोनावर मात करण्यासाठी लागणारी प्रतिकारशक्ती वाढल्याने नक्कीच फायदा होईल असे ग्रामस्थांत बोलले जात आहे.
Be First to Comment