Press "Enter" to skip to content

ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा  

परिवाराला जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य करा : आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री व आरोग्य मंञ्यांकडे मागणी  🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / पनवेल (प्रतिनिधी) 🔷🔶🔷🔶

रायगड जिल्हयातील ज्येष्ट पत्रकार दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी तसेच त्यांच्या परिवाराला शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य मिळावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.        

या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना  दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, दिनांक ०९ सप्टेंबर २०२० रोजी कर्जत माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांचा शासनाच्या रुग्णवाहिका मधून रुग्णालयात घेवून जात असताना ऑक्सिजन संपला व दुसरा ऑक्सिजन वेळेत न लावल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. केवळ सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणाने एका चांगल्या पत्रकाराला आपला जीव गमवावा लागला.

सद्यस्थितीत कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे, यातच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व अत्यावश्यक उपचाराअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच वैद्यकीय शासकीय अपूरी यंत्रणा अशीच राहीली तर भविष्यात अनेक रुग्णांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागणार आहेत. या सर्व परिस्थितीला स्थानिक लोकप्रतिनिधीना सामोरे जावे लागत आहे.  शासनामार्फत यासंदर्भात तातडीने सेवा सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले असून ‘रायगड माझा’ व ‘महाराष्ट्र न्यूज २४’ या स्थानिक वृत वाहिनीचे संपादक ज्येष्ट पत्रकार तथा माथेरानचे माजी नगरसेवक दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी व त्यांच्या परिवाराला जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य करावे अशी आग्रही मागणी करून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.