सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी 🔶🔷🔶🔷
पननेल तालुक्यातील कळंबोली गावातील कडवे शिवसेना पदाधिकारी अंकुश कडव यांचे वयाच्या 63 व्या वर्षी कोरोनाने निधन झाले.
त्यांना बुधवार दि. 9 सप्टेंबर रोजी श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून पॅनासिया हाँस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी त्यांना कोरोना पाँझिटीव्ह असल्याचे समोर आले. सुरुवातीला त्यांना उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तेथे आँक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने नविन पनवेल येथील पॅनेसिया हाँस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार चालू असताना आज ( दि 12 ).रोजी त्यांची प्राणज्योत मावळली त्यांना पत्नी, दोन मुले मुली व नातवंडे असा परिवार आहे.
अंकुश कडव यांनी शिवसेनेची स्थापना झाल्यापासून कट्टर शिवसैनिक म्हणून आपली ओळख बनविली होती. शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांचे ते खंदे सहकारी होते. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी उडी घेत आपला दबदबा ठेवला होता. सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून जाणा-या अकंश कडवाना येथील जनतेने भेट देताना त्यांच्या आर्धांगिनी यांना पंचायती समिती निवडणूकीत निवडून दिले होते. कळंबोली शहर व परिसरात शिवसेना वाढविण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. कळंबोली विभागावर त्यांनी वर्चस्व ठेवले होते असा कट्टर कडव्या शिवसेना पदिधिका-याच्या निधनाने शिवसेनेेचे मोठे नुकसान झाले आहे.
Be First to Comment