सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔶🔷
कोरोनाची तपासणी करायला येणारे रुग्ण हे खासगी गाड्यांमधून ये-जा करीत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अशा संसर्ग झालेल्या रुग्णांला कोरोनाची तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ये-जा करण्यासाठी वाहनांची सोया करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शासन याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्याला कारण ही तसेच आहे, शासन प्रयत्न करीत असले तरी यासाठी येणारा लाखोंचा निधींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासकीय हॉस्पिटलमध्ये कोरोनाची तपासणी करून काही क्षणातच निगेटीव्ह व पॉझिटीव्हचा रिपोर्ट मिळण्याची सोय केली आहे. परंतु एखाद्याला संसर्ग असेल आणि त्याला कोरोनाची तपासणी करावयाची असेल तर स्वतःच यावे लागते. त्यामुळे सदर रुग्ण खासगी अथवा स्वतःच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये येऊन कोरोनाची तपासणी केली जाते.
या तपासणी नंतर रिपोर्ट येतो, त्यामध्ये निगेटीव्ह असेलतर ठीक पण पॉझिटीव्ह आल्यानंतरही पुढील उपचारासाठी सदर पेशंटला खासगी अथवा स्वतःच्या वहानांनी जावे लागते.
कोरोना पॉझिटीव्ह ज्या वहानातून येतो त्यामधील वहान चालक यांना कोरोनाची बाधा होऊ शकतो तसेच खासगी वहाने ही भाडे घेऊन येत असतात. त्यानंतर सदर वहाने सॅनिटायझर न मारताच त्यामध्ये अनेकजण प्रवास करीत असतात. त्यांनाही कारण नसताना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. तरी शासनाने ज्यांना कोरोनाचा संसर्ग वाटत असेल त्यांना घरापासून थेट हॉस्पिटलपर्यंत ये-जा करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी.
अशा अनेक कारणांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यावर ठोस उपाययोजना करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. यासाठी शासनाने अशा रुग्णांसाठी ये-जा करण्यासाठी अंब्युलन्सची सोय करावी अन्यथा कोरोनाला रोखणे अवघड आहे.
Be First to Comment