Press "Enter" to skip to content

कोरोना मृतांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्काराची चित्रफित द्या : मनसेची मागणी

सिटी बेल लाइव्ह / पनवेल –राकेश खराडे 🔶🔷🔶🔷

गेल्या काही महिन्यांत कोविड १९ या रोगाने जगभर कहर माजवला आहे. या रोगाने मृत्यु पावलेल्या नागरीकांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना दिला जात नाही. शिवाय तो ज्या डेडबॉडी कवरमध्ये ठेवला जातो ती अपारदर्शक असल्याने नागरिकांना त्यांच्या प्रिय व्यक्तीचे अंतिम दर्शनही होत नाही.

गेल्या काही महिन्यात कोरोना रूग्णांचे मृतदेहच अदलाबदली झाले, चुकूण दुस-याच रूग्णाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार झाले वा काही ठिकाणी तर मृतदेहाच्या शरीरातील काही भाग गायबच झाले असल्याच्या बातम्याही मिडीयावर होत आहेत.त्यामुळे जर हे बॉडी कवर पारदर्शक ठेवल्यास नातेवाईकांना त्यांच्या प्रिय व्यक्तीचे अंतिम दर्शनही घेता येईल आणि उपरोक्त गोंधळाला आळाही बसेल.

या एका बदलासाठी पालिकेचा एक नया पैसाही अतिरीक्त खर्च होणार नाही. त्यामुळे मनसेचे तालुकाध्यक्ष अविनाश नारायण पडवळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन देवून मागणी केली.

ज्या मयत रूग्णाच्या नातेवाईकांना त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या अंतिम संस्काराची चलचित्रफित हवी असेल त्यांना ती देण्याची व्यवस्था करावी असे निवेदनात नमूद असून जे काही अतिरिक्त शुल्क असेल ते महानगरपालिकेने जरूर वसुल करावे.

अशी चित्रफित उपलब्ध झाल्यास त्यांना मृतदेहाचे अंतिम दर्शनही होईल त्याचप्रमाणे मृतदेहाच्या विटंबनेचे प्रकार थांबतील अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष अविनाश नारायण पडवळ यांनी पत्राव्दारे केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.