20 जण बरे होऊन घरी परतले,
एकूण बाधीत 309
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत ) 🔷🔶🔷🔶
सुधागड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाची साथ वेगाने फैलावताना दिसत आहे. कोरोना काही केल्या आटोक्यात येत नसल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी (दि.10) उशिरा प्राप्त अहवालानुसार तालुक्यात 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 20 जण बरे होऊन घरी परतले आहेत. सुधागड तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या आलेखा बरोबर मृत्युदर ही वाढत आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा व तालुका प्रशासन ताकतीने काम करीत आहे. याकामी येथील सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संघटना वस्तूरूपी मदतीचा हात देताना दिसत आहेत.
सुधागड तालुक्यात आता कोरोनाचे 309 रुग्ण झाले असून आत्तापर्यंत कोरोनाचे 202 रुग्ण बरे झाले आहेत. तर तब्बल 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आणि 91 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे.
कोरोना संसर्ग नियंत्रण आणण्यासाठी जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. प्रशासन योग्य प्रकारे काम करत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य आणि नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे.
Be First to Comment