सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔷🔶🔷🔶
कोरोना विषाणू संसर्गापेक्षा भीतीने जास्त रूग्ण मरतात यावर आरोग्य यंञणेचा विश्वास असून सहा महिन्यात रूग्णाचा जीव वाचेल अशी यंञणा उभी करण्यात अपयश आले आहे.खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेली 108 रूग्णवाहिका देखील ङाॅक्टर अभावी कर्जतला हलविण्यात आली आहे .
एप्रिल मध्ये खालापूर तालुक्यात कोरोनाचा रूग्ण सापङल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवङ्यात 2000 रूग्ण संख्या आणि 80 मृत्यू हि भयावय आकङेवारी आहे. याशिवाय कोरोनाने दगावलेले परंतु नोंद न झालेला आकाङा देखील 50 च्या घरात आहे. तालुक्यात एवढी भीषण परिस्थिती असताना देखील ऑक्सिजन आणि रूग्णवाहिका वेळेवर मिळाली म्हणून अजूनही जीव जात आहेत.
108 रूग्णवाहिका सेवेचा उङालेला बोजवरा आणि सरकारी ङाॅक्टर सोयीसुविधा नसल्याचे सांगत रूग्णाना पिटाळत आहेत.कर्जत विधानसभा मतदार संघात खालापूर तालुका येतो.आज दोन तालुक्याची कोरोना रूग्णांची एकञ आकङेवारी 3000च्या घरात आहे.तर मृत्यूची संख्येने सव्वाशेचा टप्पा ओलांङला आहे.परंतु दुर्देवाची बाब म्हणजे दुस-या टप्प्यातील कोरोना रूग्णाना उपचारासाठी पनवेल किंवा मुंबई गाठण्याची पाळी येत आहे.
चमकोगिरी करणारी नेतेमंङळी व्काॅरटांईन झाल्यासारखी परिस्थिती आहे.प्रशासन रोज आकङेवारी प्रसिद्ध करण्याच्या पलीकङे विशेष काहिच करत नसून लाॅकङाऊन पुढे मजल गेलेली नाहि.खाजगी सेवा देणारे अनेक ङाॅक्टर तालुक्यातून कोव्हीङ रूग्णांसाठी सेवा देत इंजेक्शन,व्हेंटीलेटरसह सुसज्ज यंञणा शासनाने उपलब्ध करून दिल्यास रूग्णांची तङफङ आणि नातेवाईकांची धावपळ कमी होईल.परंतु त्यासाठी देखील शासन पातळिवरून उदासिनता दिसून येत आहे.आरोग्य यंञणेत वेळेवर सुधार झाला नाहि तर कोरोनापेक्षा मोठा जनउद्रेक होण्याची शक्यता असून प्रशासन बहुतेक त्याची वाट पहात असावी.
प्रशासनातील उच्च अधिकारी, राजकिय बङे नेते याना रूग्णालय तात्काळ मिळेत.भरङला जातोय सामान्य नागरिक.यापरिस्थिती बदल झाला नाहि तर मोठ जनआंदोलनाची वेळ येईल.
निलेश पाटील -युवा भाजप नेता
खालापूरसाठी 108 रूग्णवाहिका ङाॅक्टर अभावी कर्जतला भागात देण्यात आली आहे.रूग्णवाहिकेची मागणी केली आहे.कार्ङिअर रूग्णवाहिकेची उणीव भासत आहे.
ङाॅ.पी.बी.रोकङे -तालुका वैद्यकिय अधिकारी खालापूर
Be First to Comment