Press "Enter" to skip to content

उरणमध्ये आज २१ पॉझिटीव्ह तर दोघांचा मृत्यू


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह २१ जण सापडले आहेत. ७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर आज २ जण मयत झाले आहेत.

आज एकूण पॉझिटीव्ह १५८०, उपचार करून बरे झालेले १२५३, उपचार घेणारे २५३, मयत ७४ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज वेश्वि २, बोकडविरा १, नागाव २, जासई २, नागाव पोलीस लाईन १, जेएनपीटी टाऊनशीप २, मोठी जुई १, सावरखार १, जासई रमेश पेट्रोलपंप १, पाणजे १, मुळेखंड १, पिरकोन १, चिरनेर १, ओमसाई बिल्डिंग उरण १, विंधणे १, गोवठणे १, ओएनजीसी गेटजवळ नागाव १ असे एकूण २१ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. जासई २, साईनगर करंजा १, द्रोणागिरी उरण १, जेएनपीटी टाऊनशीप २, साई अपार्टमेंट आंदनगर १, असे एकूण ७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर ओएनजीसी गेटजवळ नागाव १, गणपती मंदिर विनायक १ असे दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत चालला आहे. जनतेकडून नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.