काळजी घेण्याचे डाॅ. चेतन म्हात्रे यांचे आवाहन 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) 🔷🔶🔶🔷
कोरोना महामारीचे संकट कधी जाईल याचीच चिंता सर्व जनतेस लागलेली असून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेक रुग्ण दगावत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागोठणे शहरात १३० रुग्णांसह नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात ४०७ असे एकूण ५३७ कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी दिली आहे.
यातील बहुतांशी रुग्णांनी कोरोना रोगावर मात करण्यात यश मिळविले आहे. मात्र असे असले तरी वाढती रुग्णसंख्या पाहता वृध्द व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, बाहेर पडले तर मास्कचा वापर आवश्यक करावा तसेच जवळ सॅनिटायजर ठेवावे अशा महत्वपूर्ण सूचनाही डाॅ. चेतन म्हात्रे यांनी केल्या आहेत.
Be First to Comment