सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔷🔶🔷🔶
पाच महिने अत्यंत काळजीपुर्वक जीवन व्यथित करत असताना कोरोना बाबतीत
पुसटशी कल्पना नसणाऱ्या माथेरान करांना गणेशोत्सव संपताच कोरोना सारख्या आजाराला सामोरे जावे लागण्याची वेळ येऊन ठेपली असल्याने नागरिकांमध्ये सध्यातरी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरदिवशी एक दोन रुग्ण कोरोना पॉजीटीव्ह असल्याचे निदर्शनास येत असून वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर एकप्रकारे हे आव्हान उभे ठाकले आहे. नगरपरिषद प्रशासन आपल्या माध्यमातून वारंवार नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यासह इतरांची कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणेबाबत सूचना दिल्या जात आहेत परंतु त्यांच्याच कार्यालयात एकूण तीन कोरोना पॉजीटीव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे सर्वांसमोर एकप्रकारे मोठे आव्हान आहे. अनेक गावकरी सर्दी, ताप खोकला येत असताना दवाखान्यात उपचार न घेता मेडिकल मधून गोळ्या आणून संभाव्य कोरोना सारख्या आजाराला निमंत्रण देत आहेत.
नियमितपणे तीस ते चाळीस रुग्ण सर्दी ताप खोकला यासाठी औषधोपचार घेण्यासाठी खाजगी दवाखान्यात गर्दी करताना दिसत आहेत परंतु स्वतःची कोरोना तपासणी करून घेत नाहीत त्यामुळे आगामी काळात मोठया प्रमाणावर इथे कोरोना रुगणांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आजार लपवून आणखीन वाढणार आहे त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियम अटींचे पालन करणे आवश्यक आहे.
माथेरान हे खूपच छोटे पर्यटनस्थळ असल्याने सर्व नागरिक हे नेहमीच एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. ज्यांच्या घरातील रुग्ण कोरोना पॉजीटीव्ह आहे अशा घरातील अन्य सदस्य बिनधास्तपणे बाजारात वावरताना दिसत आहेत यातूनच ह्या आजाराने आपले डोके वर काढले आहे.
प्रत्येकाने स्वतः सह अन्य लोकांची काळजी घेतली नाही तर पुढील काळात पर्यटन हंगामात खूप त्रासदायक आणि पर्यटनाला मारक असे प्रकार या संकटकाळात घडण्याची दाट शक्यता आहे. गणेशोत्सव काळात काही हौशी परमार्थिक लोकांनी भजनाचे कार्यक्रम घरोघरी जाऊन आयोजित केले होते.त्यामुळे भजनी मंडळात अनेकजण पॉजीटीव्ह दिसून आले आहेत.
नगरपरिषदेने त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केले आहेत त्यात कोरोन्टईन होऊन बरे होण्याची संधी उपलब्ध आहे त्यासाठी प्रत्येकाने आपली वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य आहे.माथेरान हे पाच महिन्यानंतर अनलॉक केल्यामुळे पर्यटकांना प्रवेश देण्यात आला आहे पर्यटक येतील तेव्हाच इथे प्रत्येकाला उत्पन्नाचे साधन प्राप्त होणार आहे.
पुढील सुट्टयांच्या हंगामात कोरोना आजाराला सोबत घेऊन प्रत्येकाला आपले आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. इथे दरदिवशी रुग्ण आढळून येत आहेत परंतु शासनाच्या नियम व अटींचे पालन केल्यास हमखासपणे यावर मात सुध्दा करता येऊ शकते.
Be First to Comment