सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) 🔶🔷🔶🔷
नागोठण्याजवळच असलेल्या पाटणसई ग्रामपंचायत हद्दीमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे येथील मुंबई -गोवा महामार्गावरील तसेच वाकण-पाली-खोपोली मार्गावरील महत्वाचा नाका असलेल्या वाकण नाक्यावर चार दिवसांचा लाँकडाऊन राहणार असल्याचे पाटणसई ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
संपुर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा, सुधागड, पेण या तालुक्यांमध्ये कोरोनाने अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. याच दरम्यान नागोठणे जवळील पाटणसई ग्रामपंचायत हद्दीमध्ये अधिक प्रमाणात कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभुमीवर मंगळवार दि.८ सप्टेंबर ते शुक्रवार दि.११ सप्टेंबर पर्यंत असा चार दिवसांचा लाँकडाऊन वाकण नाक्यावर लागु करण्यात आला आहे. या चार दिवसांमध्ये वाकण नाक्यावरिल सर्वच दुकाने, बंद राहणार आहेत. त्यानंतर शनिवार दि.१२ सप्टेंबर रोजी वाकण नाक्यावरील सर्व व्यवहार पुर्ववत सुरु राहणार असल्याचे ग्रामपंचायतीकडुन सांगण्यात आले आहे.
दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पाटणसई ग्रामपंचायीने घेतलेल्या चार दिवसाचा लाँकडाऊनच्या महत्वपुर्वक निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
Be First to Comment