Press "Enter" to skip to content

कोरोना रुग्णांना आता मोफत इंटरनेटचे एंटरटेनमेंट …!


वावळोळी कोव्हीड केअर सेंटर मध्ये मोफत वायफाय सुरु…

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत)🔶🔷🔶🔷

सुधागड तालुक्यातील एकमेव कोव्हीड केअर सेंटर वावळोली आश्रमशाळा येथे आहे. पाली पासून 2 ते 3 किमीवर असल्याने येथे मोबाईल व इंटरनेटची रेंज फारच कमी आहे. अशावेळी कोव्हीड रुग्ण आणि डॉक्टर यांना संपर्क करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. याबरोबरच इंटरनेट अभावी रुग्ण अधिक निराश होतांना दिसत होते.

प्रशासनस्थरावर याची चर्चा झाल्यावर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश देसाई यांनी इंटरनेट सेवेसाठी सहकार्य करणार असल्याची तयारी दर्शवली. प्रकाश देसाई यांच्या पुढाकाराने वावळोली कोव्हीड केअर सेंटर मध्ये मोफत वायफाय सुरु करण्यात आला आहे.

वावळोली कोविड केअर सेंटरमधील दाखल रुग्णाची मानसिक स्थिती आनंदी होणे. त्याचा जगाशी व कुटुंबातील व्यक्तींशी संपर्क होणे अत्यंत गरजेचे होते. वैचारिक तसेच वेगळ्या मानसिकतेतून जाणाऱ्या या रुग्णासाठी दिवसभर व्यस्त राहणे तसेच मानसिक स्वास्थ्य चांगले राहणे अत्यंत महत्वाचे असते आणि या सर्व प्रक्रियेत कुटुंबातील सदस्यांनी संपर्कात राहणे आणि त्यांची चर्चा होणे आवश्यक होते. याबरोबरच इंटरनेटद्वारे सोशल मीडिया व बातम्या आदींद्वारे मनोरंजन व माहिती मिळविणे देखील तितकेच महत्वाचे आहे. परंतु वावळोली येथे इंटरनेट कनेक्शन नसल्याने यासर्व प्रक्रियेत बाधा येत होती. याबाबतीत अनेक मान्यवरांनी व कोविड रुग्णांनी मागणी केल्यानंतर प्रकाश देसाई यांनी वायफाय जोडणीसाठी लागणारा सर्व खर्च उचलायची तयारी दर्शवली. त्यांनी 20 हजारांचा निधी दिला. तसेच तीन महिन्यांच्या रिचार्ज देखील केला. मग अंकिता स्टार व्हिजनचे मनीष खोडागळे आणि ओंकार सातूरडेकर या तरुणांनी एका दिवसात वावळोली कोविड केअर सेंटरमध्ये इंटरनेट कनेक्शन पोहचवले.

त्यामुळे आता येथील रुग्णांना आपल्या कुटुंबीयांशी सोशल मीडिया अथवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात राहता येणार आहे. व आपले मानसिक आरोग्य सदृढ राखता येईल. या वायफाय कनेक्शनसाठी प्रकाश देसाई, तहसीलदार दिलीप रायन्नावार, विनोद भोईर, परेश शिंदे, रवींद्रनाथ ओव्हाळ आणि अंकिता स्टार व्हिजनचे मनीष खोडागळे आणि ओंकार सातूरडेकर यांचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शशिकांत मढवी व कोविड केअर सेंटरचे ईंचार्ज डॉ. नंदकुमार मुळे यांनी आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.