सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यात भेंडखळ गावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने ग्रामपंचायतीने गाव येत्या शुक्रवार ११ ते १८ सप्टेंबर असा ८ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
भेंडखळ गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन आजपर्यंत ९ पेक्षा अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गावात कोरोनाने मृत्यू झालेल्यांमध्ये आई-वडील व मुलाचा समावेश आहे. तसेच इतर नातेवाईकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे गावात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.
गावातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी येत्या शुक्रवार दि. ११ ते १८ सप्टेंबर असा ८ दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. या ८ दिवसांत कामगारांना कामावर जाण्यास सवलत देण्यात आली आहे. इतरांना अत्यावश्यक असेलतरच गावाबाहेर पडता येईल अन्यथा नाही. तसेच गावातील दुकाने सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंतच सुरू राहातील. याची ग्रामस्थांनी नोंद घेऊन लॉकडाऊन काळात लागणारे धान्यसाठा भरून घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतींने केले आहे.
ग्रामपंचायतींने आजपासून घरटी प्रत्येक व्यक्तींची ऑक्सिजन तपासनीसह मधुमेह, बीपी, दमा व इतर आजारांची डॉक्टरांच्या साह्याने तपासणी सुरू केली आहे. तपासणीमध्ये कोणाला समस्यां जाणवली तर सबधितांना पुढील उपचार करून घेण्यास सांगितले जणार आहे. जेणेकरून गावात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसेल तरी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
Be First to Comment