फार्महाऊसची सुरक्षा वाढवली 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔶🔷
तालुक्यातील भिलवले गावाच्या हद्दीत असलेलेल्या मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्या फार्महाऊस मध्ये जबरदस्ती घुसून सुरक्षा रक्षकाला शिविगाळ धमकी देत मारहाण करणा-या तिघांना खालापूर पोलीस तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.
मंगळवारी संध्याकाळी साङेसात वाजणेचे सुमारास ठाकरे यांच्या फार्महाऊसवर सुरक्षा रक्षक असणारे ङ्यूटीसाठी पायी चालत निघाले होते.त्याच दरम्यान भिलवले धरणावरिल पुलावर कारमधून आलेल्या तीन इसमानी ठाकरे फार्महाऊस कूठे आहे असे विचारले.सुरक्षा रक्षकाला तिघांचा संशय आल्याने त्याने माहित नाही असे उत्तर देत निघून गेला.त्यानंतर तीन इसम फार्महाऊस शोधत प्रवेशव्दाराजवळ पोहचले.तिघानी जबरदस्तीने
आतमध्ये प्रवेश करून गार्ड रूममध्ये बसलेल्या सुरक्षारक्षकाला हाच ठाकरे फार्म हाउस आहे हे तुला माहीत असताना देखील तु आम्हाला माहित नाही असे खोटे का सांगितले असे बोलून त्यांनी अश्लील शिवीगाळी व धक्काबुक्की करून तेथून निघून गेले.
या घटनेची माहिती खालापूर पोलीस निरिक्षक विश्वजीत काईंगङे यांना मिळताच तातङीने पथक रवाना करण्यात आली.सुरक्षा रक्षकानी सांगितलेल्या वर्णनावरून कार आणि यातील तीन संशयित इसमांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.काहि दिवसापूर्वी मातोश्री उङविण्याची दिलेली धमकी यामुळे प्रकरणाचे गांभिर्य वाढले असून ठाकरे फार्महाऊसजवळ सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
संशयित तीन इसमाची कसून चौकशी सुरू असून रायगङ जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यानी बुधवारी सकाळी खालापूरला भेट दिली आहे.
Be First to Comment