Press "Enter" to skip to content

राग काढणे पडले महाग

राग काढणे पडले महाग

लाईन जज ला चेंडू मारल्याने जोकोविच अमेरिकन ओपन स्पर्धेबाहेर

सिटी बेल लाईव्ह/न्यूयॉर्क 
     रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या दोन दिग्गजांच्या अनुपस्थितीत सर्बियाचा नोवाक जोकोविच अमेरिकन ओपन टेनिस जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र रागाच्या भरात महिला अधिकाऱ्याला (लाईन जज) चेंडू मारल्याप्रकरणी त्याला अपात्र ठरवून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ग्रॅण्डस्लॅममधून अपात्र ठरवण्यात आलेला तो तिसरा खेळाडू ठरला.

अव्वल क्रमांकाचा नोवाक जोकोविच रविवारी स्पेनचा पाब्लो कारेनो बस्टा याच्याविरुद्ध उपउपांत्यपूर्व सामन्यात पहिल्या सेटमध्ये ६-५ असा पिछाडीवर होता. त्याचवेळी रागाच्या भरात त्याने बेसलाईनच्या मागे चेंडू भिरकावला.

हा चेंडू कोर्टवर उभ्या असलेल्या एका महिला अधिकाऱ्याच्या मानेला लागताच त्या खाली पडल्या.
महिलेला चेंडू लागल्याची चूक लक्षात आल्यावर जोकोविचने तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली. संबंधित महिला अधिकाºयाला श्वास घेण्याचा त्रास होत होता. काही मिनिटांनी त्या तेथून निघून गेल्या. या घटनेनंतर रेफ्रीने पंचांशी १० मिनिटे चर्चा केली आणि जोकोविचचा प्रतिस्पर्धी बुस्टा याला विजयी घोषित करण्यात आले. घोषणेनंतर जोकोविचने त्याला शुभेच्छा दिल्या आणि कोर्टमधून बाहेर पडला. या घटनेमुळे जोकोविचचे १८ वे ग्रॅणडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले.


याआधी १९९० साली जॉन मॉकेन्रोला आॅस्ट्रेलियन ओपन आणि २००० साली स्टफान कोबेके याला फ्रेंच ओपनमधून अपात्र करण्यात आले होते. मीडियाशी संवाद न साधता जोकोविचने स्वत:चा माफीनामा प्रसिद्ध केला. जोकोविचला स्पर्धेतून मिळणारे रँकिंग गुण आणि दोन लाख ५० हजार डॉलरची रक्कम दिली जाणार नाही. (वृत्तसंस्था)

‘या घटनेमुळे दु:खी आहे. लाईन जजबद्दल जाणून घेतले. त्या चांगल्या असल्याची माहिती मिळाली. मी हेतुपुरस्सर असे केले नाही. अपात्र ठरवणे हा माझ्यासाठी धडा आहे. याचा उपयोग चांगली व्यक्ती बनण्यासाठी करावा लागेल. स्पर्धेतील माझ्या वागणुकीसाठी आयोजक आणि चाहत्यांची माफी मागतो.’
-नोव्हाक जोकोविच

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.